उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिकसामाजिक

उमरखेडचे भुमीपुत्र डॉ. शहरीयार खान यांची वैद्यकीय क्षेत्रात उंच भरारी

डीएम कार्डिओलॉजिस्ट, पीजीडीजी,सीसीएमएच ह्या पदवी केल्या प्राप्त

✍️सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर सहसंपादक)

उमरखेड :- (दिनांक 9 एप्रिल) उमरखेड सारख्या लहानशा शहरात सामान्य कुटुंबात वाढलेल्या आणि अपार मेहनतीने वैद्यकीय क्षेत्रात यशाचे शिखर गाठणाऱ्या डॉ. शहरीयार खान यांनी महाराष्ट्र राज्यात डी.एम. कार्डिओलॉजी परीक्षेत नेत्रदिपक यश प्राप्त केले .त्यांच्या या यशामुळे संपूर्ण उमरखेड शहरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

डॉ. शहरयार यांचे वडील सर्फराज खान हे उमरखेड येथीलऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेत म्हणून सेवा निवृत झाले .शैक्षणिक वातावरण असले तरीही अत्यंत साधनसंपन्न नसलेल्या परिस्थितीत शहरीयार यांनी कधीही हार मानली नाही. बाल्यकालापासूनच अभ्यासात हुशार असलेले खान यांचे प्राथमिक शिक्षण गुरुदेव गोरबा विद्यालयात झाले.

माध्यमिक शिक्षण 2008 ते 10 या काळात गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर, त्यांनी 2016 मध्ये SVNGMC यवतमाळ येथून एम.बी.बी.एस. पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था, सेवाग्राम (MGIMS) येथून 2021 बॅचमध्ये एम.डी. मेडिसिन पदवी सुवर्ण पदका सह प्राप्त केली. त्यानंतर 2025 मध्ये शासकीय मेडिकल कॉलेज व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूर येथून डी.एम. कार्डिओलॉजी ही अत्यंत प्रतिष्ठित व आव्हानात्मक पदवी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.

डॉ. खान यांचे वैद्यकीय शिक्षण इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी IGNOU, हैदराबाद येथून वृद्धजन आरोग्य विषयातील पदव्युत्तर डिप्लोमा (PGDGM) तसेच पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया, दिल्ली येथून उच्च रक्तदाब व्यवस्थापना साठी चे प्रमाणपत्र अभ्यासक्रम (CCMH) पूर्ण केले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील अनेक वैद्यकीय संशोधन निबंधांद्वारे त्यांनी शास्त्रीय क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तकी शैक्षणिक प्रगती करूनही डॉ. शहरीयार खान अतिशय विनम्र असून ते म्हणतात, “माझं शिक्षण समाजातील गरजू आणि गरीब लोकांसाठी देण्याचा मी संकल्प केला आहे.” त्यांच्या समाजभिमुख दृष्टिकोनामुळे ते आजच्या तरुण डॉक्टरांसाठी एक आदर्श आणि प्रेरणास्थान ठरले आहेत.

उमरखेड शहरासाठी हे अत्यंत गौरवाचे क्षण असून, संपूर्ण शहरातून आणि वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. खान यांचे अभिनंदन होत आहे. डॉ . खान हे आपल्या यशाचे श्रेय आई ,वडील, शिक्षकांना देतात.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!