आर्थिकताज्या बातम्यायवतमाळ

ढाणकी शहरात बोगस सिमेंट विक्री होत आहे का?

✍🏻 करण भरणे सर (ढाणकी प्रतिनिधी)

ढाणकी:- महाराष्ट्र सरकार ने पी एम घरकुल योजना मार्फत आता प्रत्येक गरिबाला घरकुल मंजूर केल्यामुळे गाव खेड्यात जास्त प्रमाणात बांधकाम चालू आहे.

या कामाला लागणारे मटेरियल गिट्टी, रेती, वीट व सगळ्यात मुख्य सिमेंट आहे.

सिमेंट हा पायाभूत सुविधा क्षेत्राचा आधारस्तंभ आहे असे मानले जाते. रस्ते, पुल, घरे, औद्योगिक व व्यावसायिक इमारती, धरण अशा सगळ्या बांधकामांसाठी त्याचा वापर होतो.

याचाच फायदा काही विक्रेता घेत असून ढाणकी सारख्या गावात नामांकित कंपनीच्या नावाखाली हलक्या दर्जाचे सिमेंट विकणे म्हणजे बोगस सिमेंट विक्री होत आहे की काय?अशी भीती लोकात निर्माण झाली आहे.

याचे नेमके कारण असे आहे की, एक राजकीय नेता यांच्या दुकान गाळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर स्लॅप टाकण्यासाठी ज्या बोगस सिमेंट चा उपयोग केला होता तो काही दिवसातच कोसळला, यात त्यांचे लाखो रुपयाचा नुकशान झाला,

पण सिमेंट दुकानदाराने आपले बिंग फुटू नये म्हणून याची भरपाई त्या राजकीय नेत्याला दिली अशी चर्चा आहे. पण या घटनेने गरीब वर्ग भयभीत असून ते शंका करत आहे की, आम्ही बांधकाम करण्यासाठी सिमेंट आणत आहे ते उत्तम दर्जाचे आहे की नाही? यावर ते म्हणतात की,

आमच्या सारख्या गरिबाला या बोगस सिमेंट चा फटका बसला तर याची भरपाई होईल की नाही? म्हणून संबंधित अधिकारी यांनी सिमेंट विक्री करणाऱ्याची सिमेंट गुणवत्ता तपासून बोगस सिमेंट विक्री वर आळा घालाण्याची मागणी आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!