ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतराजकियसामाजिक

महाबोधी बुध्द विहार बौध्दांच्या ताब्यात द्या.

[ मानवत तालुका वंचित बहुजन आघाडीची मागणी]

प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी)

मानवत:- महाबोधी बुध्द विहार बौध्दांच्या ताब्यात तात्काळ देण्यात यावे अशी मागणी मानवत तालुका वंचित बहुजन आघाडीचा वतीने मानवत तहसीलदार यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती व बिहारचे राज्यपाल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

भारतातील बिहार राज्यातील बौध्दांचे पचित्र स्थान महाबोधी विहार हे आजतागायत हिंदू पुजाऱ्याच्या ताब्यात आहे. भारतातील सर्व धर्माची मंदीरे, हिंदू मुंदीरे ही हिंदुच्या ताब्यात आहेत व मुस्लिम समाजाचा मशीदी या मुसलमानांच्या ताब्यात आहेत आणि ख्रिश्चन लोकांचे चर्च खिश्चना च्या ताब्यात आहेत.

शिखांचे गुरुद्वारे शिखांच्या ताब्यात आहेत परंतु बौध्दांचे पवित्र स्थान महाबोधीविहार हिंदु – ब्राम्हणाच्या ताव्यात कसे काय असा सवाल उपस्थित झाला आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळुन ७८ वर्षे झाली आहेत.

तरी ही बौध्दांना त्याच्या विहाराचा ताबा मिळाला नाही भारतीय संविधानानुसार ज्या त्या धर्मानुसार पूजा- अर्चाचे आचरण करण्याचा अधिकार आहे परंतु महाबोधी विहार हिंदू पुजाऱ्याच्या ताब्यात असल्यामुळे तेथे हिंदू पुजारी मोठ्या प्रमाणात अंधश्रध्देने कर्मकांड पूजा करवून घेतात बौध्द धर्मीयांना बौध्द धर्मानुसार आचरण करण्यास विरोध करतात.

हे बौध्द अनुयायाची भावना दुखावणारे आहे अर्थातच बौध्दांना संविधानाने दिलेल्या अधिकाराचा जाणून – बुजून अवमान होत आहे. जगाच्या पाठीवर कुठल्या ही एका धर्माच्या ट्रस्टी मंडळावर दुसऱ्या धर्माचा अधिकार होऊ शकत नाही.

ही घटना बाह्यकृती आहे म्हणून बुध्दगया मंदीर बि. टी. अ‍ॅॅक्ट १९४९ चा कायदा रद्द करावा व महाबोधी विहार बौद्धगयाचा ताबा हा बौध्दांना सुपुर्त करावा व त्यांच्या ताब्यात दयावे अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र अंदोलन छेडण्यात येईल.

असा इशारा ही यावेळी देण्यात आला असून निवेदनावर भारिप माजी जिल्हाध्यक्ष धम्मपाल सोनटक्के, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष श्रीरंग पंडित, तालुध्यक्ष अ‍ॅड. दिगांबर घुगे, महिला तालुकाध्यक्ष मंदाकिनी राठोड, तालुका महासचिव जालिंदर वाघमारे,

तालुकाउपाध्यक्ष मदन आवचार, तालुकाध्यक्ष बापूराव धबडगे, तालुका संघटक विश्वानाथ गवारे, गुंडिबा हारणे, नरेंद्र कांबळे, अनुरथ सोनटक्के, भागवान सरोदे, शांतपाल तुपसमुंद्रे, गौतम गायकवाड, किशन वाघुले यांच्या सह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!