उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिकसामाजिक
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड मध्ये राजस कॉम्प्युटर उमरखेड तर्फे परीक्षेच्या साहित्याचे वाटप
✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड :- दिनांक 7 मार्च, उमरखेड महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथे राजेश कॉम्प्युटर उमरखेड तर्फे अध्ययन साहित्याचे वितरण शिवजयंतीच्या निमित्त करण्यात आले आहे.


या कार्यक्रमासाठी राजेश कॉम्प्युटर चे संचालक सतीश मुटकुळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोदराव देशमुख, पर्यवेक्षक श्री सुरते सर शिक्षक प्रतिनिधी कनाके सर विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शिवजयंती उत्सवात सहभाग घेणाऱ्या 300 विद्यार्थ्यांना एक्झाम पॅड वाटप करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. आर. डी. शिंदे सर यांनी केले तर आभार श्री. आर. जे शिंदे सर यांनी मानले.

