उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसन्मान सत्कारसामाजिक

उमरखेड तालुक्यातील हरदडा येथे 3 री अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड तालुक्यातील हरदडा येथे 30 मार्च रोजी तिस-या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून विशेष आकर्षणांसह वैचारीक विचारांची मेजवाणी सोबतच अनेक सामाजिकदृष्या उपयुक्त उपक्रमांची नांदी असलेल्या या सामाजिक उपक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

प्रणिताताई बहुउद्देशीय संस्था हरदडा यांच्याकडून येत्या 30 मार्च 2026 रोजी होत असलेल्या तिस-या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून भिमटायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके हे लाभणार आहे. सलग तिस-या वर्षी होत असलेल्या धम्म परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत बनसोड तर स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे व युवराज मोहन मोरे हे असणार आहेत. विशेष अतिथी म्हणून मा. आ. किशनराव वानखेडे यांच्यासह प्रकाश पाटील देवसरकर, विजय खडसे, नामदेवराव ससाणे, उत्तमराव इंगळे या माजी आमदारांसह भाजपाचे मा. जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे,

तर धम्म परिषदेतील विशेष आकर्षण म्हणजे आंबेडकरी समाजातील तळागाळातल्या बुद्धीमान व होतकरू विद्यार्थ्यांना प्रशासनाती मोक्याच्या जागेवर बसण्यासाठी तयार करून अक्षरशः आंबेडकरी समाजातील विद्यार्थ्यांमधील बुद्धीचा खजिना शोधून त्यास उजाळी देवून तरूण पिढीला घडविण्याचे मोलाचे कार्य मागील अनेक वर्षांपासून करीत असलेले आंबेडकरवादी मिशन केंद्र नांदेडचे प्रमुख मा. दिपक कदम सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार असून यावेळी प्रमुख मार्गदर्शक दादासाहेब शेळके (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना) यांच्यासह डॉ. आयुब खाँ आ. पठाण (उमरखेड), श्रीमती सुमित्राबाई संदिपान खरे (से. नि. बालविकास प्रकल्प अधिकारी) तसेच साहेबराव कांबळे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे,

तत्पुर्वी, धम्म परिषदेच्या पहिल्या पुष्पात सकाळी 7 वा.धम्मभगिनी आयु. सुजाताताई अशोक दवने यांच्यासह शांताबाई शंकर कांबळे व छाया विनयराव कवडे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन पार पडल्यानंतर दुस-या पुष्पात सकाळी 8 वा. भदंत पय्याबोधी थेरो, अध्यक्ष भिक्खू संघ तथा प्रमुख श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा जि. नांदेड यांच्यासह भिक्खूसंघाची धम्मदेसना होणार असून तिस-या पुष्पात सायं. 7 वाजता विविध वियातील तज्ञ वक्त्यांचे व्याख्यान होणार आहे.

नंतर चौथ्या पुष्पात रात्री 8 वा. गौरव सोहळा समारंभात जयकिशनराव रावळे ता. अध्यक्ष वं.ब.आ. हदगाव यांच्यासह अमोल कदम (युवा उद्योजक तामसा), पत्रकार सिध्दार्थ दिवेकर, प्रफुल दिवेकर सामाजिक कार्यकर्ते, उषाताई इंगोले अध्यक्षा रमा माता महिला मंडळ, उमरखेड, लक्ष्मण वाठोरे, हरीदास कदम वायफना तसेच रहिम शेख, रिलस्टार वायफना याच्यासह अनेकांचा गौरव व विशेष गौरवरत्न पुरस्कार समारंभ सोहळा पार पडणार आहे,

तर शेवटच्या आणि पाचव्या पुष्पात रात्री 9वा. सांस्कृतिक संध्येच्या संगितमय प्रवाहात रममाण होण्यासाठी भिमबुद्ध गितांची मेजवाणी घेवून विकास राजा नागपूरकर व संच तसेच त्यांच्या जोडीला बरोबरीच्या ताकदीने गायिका निशा धोंडगे व संच यांच्या बुद्ध-भिम गितांचा दणदणीत सामना होणार आहे.या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजिक सामाजिक कार्यकर्त्यां प्रणिता ताई कांबळे यांनी केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!