ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

पारितोषिकाची ५१ हजार रुपये रक्कम दिली सामाजिक उपक्रमाला

छत्रपती वॉरियर्स ने स्पर्धा आणि मने ही जिंकली

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत :- ( दिनांक २४ फेब्रुवारी) येथे संपन्न झालेल्या मानवत प्रीमियर लीग या क्रिकेट सामन्यात छत्रपती वॉरियर्स संघाने प्रथम क्रमांक पटकावला संघाने बक्षीसाची ५१ हजार रुपये रक्कम सारथी फाउंडेशन च्या सामाजिक उपक्रमाला देण्याचा निर्णय घेतला यामुळे छत्रपती वॉरियर्स संघाने स्पर्धेबरोबरच मने ही जिंकली असल्याचे बोलले जात आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. अंकुश भाऊ लाड मित्र मंडळाच्या वतीने मानवत येथे मानवत प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.

२३ फेब्रुवारी रविवार रोजी छत्रपती वॉरियर्स व पाटील वॉरियर्स यांच्यात अंतिम सामना होता छत्रपती वॉरियर्स संघाने दमदार कामगिरी करत सामना जिंकून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले विजेत्या संघाचे ओनर मुंजाभाऊ सुरवसे, खेळाडू आकाश गोलाईत, गजानन शिंदे, सोनु भदर्गे, अरुणराव देशमुख, गणेश साबळे, राजु इंगळे, खंडेराव राऊत, संतोष घाटुळ, सतिश काळे, पांडुरंग जाधव यांनी सर्वानुमते असे ठरवले की एकावन्न हजार सामाजिक उपक्रमाला देण्यात यावेत.

यासाठी त्यांनी शहरातील सारथी फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाची निवड केली सारथी फाउंडेशन च्या वतीने आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबातील मुलीचा विवाहाचा खर्च करण्यात येणार आहे छत्रपती वॉरियर्सच्या या निर्णयामुळे स्पर्धा जिंकून मनेही जिंकल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

यावेळी छत्रपती वॉरियर्स संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!