विज्ञानवारी टप्पा तीन मध्ये उक्कलगाव जि.प. प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी सदृशी पिंपळे हिची परीक्षेमध्ये निवड
✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238
मानवत:- (दिनांक 24 फेब्रुवारी) मानवत तालुक्यातील मौ. उक्कलगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी कु. सदृशी अंबादास पिंपळेवर्ग सातवा हिची परभणी येथे झालेल्या परीक्षेमध्ये निवड झाली.

ही परीक्षा पूर्णतः प्रात्यक्षिक स्वरूपाची होती या परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या चार विषयावर प्रत्येकी २५ गुणाचे प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आली होती.

ही प्रात्यक्षिक परीक्षा एकूण शंभर गुणाची घेण्यात आली या मध्ये प्रयोग सादरीकरण करणे, प्रयोगावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिणे, त्याच बरोबर प्रयोगाशी संबंधित असणाऱ्या वस्तूंची ओळख या विविध स्वरूपाचे प्रश्न प्रत्येक विषयासाठी देण्यात आलेले होते.

मानवत तालुक्यामधून जिल्हा परिषदेतील तीन आणि संस्थेच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.

या मध्ये उक्कलगाव जि.प. प्राथमिक शाळेचा नावलौकिक विद्यार्थीनी सदृशी अंबादास पिंपळे हिने जिल्हा स्तरावर केला आहे त्या बद्दल सदृषीचे व मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती अलका सातपुते यांचे शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करून शुभेछा देण्यात आल्या.
