श्रीक्षेत्र देवसरी येथे घरकुल मंजूरीच्या आदेश प्रमाणपत्राचे सरपंच सौ. मिनाक्षी चंद्रमणी सावतकर यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वाटप
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड तालुक्यातील देवसरी येथे ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार आणि ग्राम विकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन यांचे द्वारा आज दिनांक २२/०२/२०२५ रोजी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत मंजुरीचे आदेश प्रमाणपत्राचे वितरण लाभार्थ्यांना श्रीक्षेत्र देवसरी येथे कार्यक्रमाचे अध्यक्षा तथा सरपंच सौ. मिनाक्षी चंद्रमणी सावतकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सुरवातीला उपस्थीत लाभार्थ्यांचे सरपंचाच्या वतिने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तंत्रज्ञ अमोल देवराये यांनी केले.प्रधाममंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात श्रीक्षेत्र देवसरीला ७१ घरकुलांचे लक्षांक प्राप्त असून काल ६५ लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला आहे.
बँकखात्याच्या कागदपत्राच्या अभावी ६ लाभार्थी बाकी राहीले तेही लवकरच जमा होतील.

एकाच वेळी राज्यात २० लाख घरकुलांच्या मंजुरीपत्रांचे वाटप व १० लाख घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याचे १५०० कोटी निधीचे वितरण व यवतमाळ जिल्ह्याला १२२६०८ एवढे उद्दीष्ट दिले होते. पैकी ११२००० मंजूरी मिळाली.

पैकी ९०६१६ लाभार्थ्यांना पहिला हप्ता (एकून १३५ कोटी) खात्यात जमा करण्याचा कार्यक्रम केद्रीय गृहमंत्री मा. अमितजी शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला पुणे येथील ऑनलाईन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी दाखवण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा. उपसरपंच गजानन पाटील देवसरकर, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी श्री अंबोरे, कार्यालयीन कर्मचारी श्री. अंबादास देवसरकर, श्री. गजानन देवसरकर, रोजगार सेवक श्री. प्रभाकर सावते, यांनी मोलाचे सहकार्य केले.

हा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या हॉल मध्ये संपन्न झाला.
