ताज्या बातम्यापरभणीमानवतशैक्षणिकसन्मान सत्कार

मानवत येथील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा सेमी विद्यालयाची यशस्वी वाटचाल

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत :- ( दिनांक २३ फेब्रुवारी )मानवत येथील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मानवत विद्यालयाचा विद्यार्थी नयन अरुण गवते परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी अंतर्गत विज्ञानवारी आयुका पुणेसाठी घवघवीत यश संपादित करून पात्र झालेला आहे.

परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी अंतर्गत विज्ञानामध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदरील परीक्षा घेतली जाते.

पहिल्या टप्प्यामध्ये तालुका स्तरावरती यश संपादित करून जिल्हास्तरावरील प्रात्यक्षिक परीक्षे मध्ये त्याने यश संपादित केले परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी चे सर्व सन्माननीय मान्यवर, कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी मा. श्री. संजय ससाने व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते व पालकांचा सत्कार करण्यात आला.

वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीसाठी दरवर्षी विज्ञानवारी उपक्रम सदरील सोसायटीकडून आयोजित केला जातो.

त्याच्या या यशाबद्दल पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष मा. श्री. विजय कुमारजी कत्रुवार, उपाध्यक्ष मा. श्री. अनिलरावजी नखाते, कोषाध्यक्ष मा. श्री. रामचंद्ररावजी कत्रुवार,

सचिव मा. श्री. बालकिशन भाऊ चांडक, सहसचिव मा. श्री. विजय कुमारजी दलाल, व सर्व पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या सन्माननीय संचालक, विद्यालयाचे शिक्षण सल्लागार मा. श्री. प्रवीण बेले, विशेष मार्गदर्शन परभणी ऍस्ट्रॉनॉ मिकल सोसायटी मानवत तालुका समन्वयक मा. श्री. संजय पक्वाने, मुख्याध्यापक मा. श्री. विश्वभूषण इंगोले, पर्यवेक्षक मा. श्री. विलास शिंदे, विज्ञान श्री. मार्गदर्शक राजेभाऊ फाटे ,व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नयन गवते चे कौतुक करत अभिनंदन केले…!!!!

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!