ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

ज्ञानेश वारकरी गुरुकुलात संत रोहिदास महाराज जयंती उत्सहात साजरी

(संतांना जातीच्या चौकटीतून मुक्त करण्याचा संकल्प)

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- ( दिनांक १४ फेब्रुवारी) येथील ज्ञानेश वारकरी गुरुकुलात संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी संतांना जातीच्या चौकटीतून मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला.

१२ फेब्रुवारी रोजी मानवत येथील संत नरहरी महाराज मंदिरातील ज्ञानेश गुरुकुलात संत रोहिदास महाराज यांचा जयंती सोहळा संपन्न झाला यावेळी ह. भ. प. माऊली महाराज चव्हाण सेलूकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.

यावेळी आयोजक ह. भ. प. पंडित महाराज डाके यांनी सांगितले की, संतांनी सर्व समाजाला आध्या त्मिक संदेश दिला.

जगाच्या कल्याणा साठी त्यांनी देह झिजवला मात्र सद्य स्थितीत प्रत्येक संतांना जाती मध्ये विभागले जात आहे. संतांनी कधीही जात मानली नाही. परंतु ते ज्या जाती मध्ये जन्मले त्या जातीमध्येच त्यांना पूजले जाते.

वास्तविक संत हे सर्व समाजाचे आहेत. ही चुकीची प्रथा मोडून काढण्यासाठी ज्ञानेश वारकरी गुरु कुलात सर्व संतांची जयंती, पुण्य तिथी प्रसंगी कीर्तन आयोजित करून साजरी करण्यात येणार आहे.

या कार्य क्रमास ह. भ. प. रामराव हेंडगे महाराज, ह. भ. प. गजानन महाराज, ह. भ. प. कृष्णा महाराज, प्रा. एस. एन. पाटील, विलास पतंगे, विनायक कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद जोशी, पत्रकार सचिन मगर, पांडुरंग जाधव, गोटू भरकड, सुरेश गोलाईत यांच्या सह परिसरातील भाविक भक्त यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!