ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिक

हत्तलवाडी जिल्हा परिषद शाळेचा शालेय समितीची निवड

(शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी ज्ञानेश्वर शिंदे, तर उपाध्यक्षपदी भगवान शिंदे यांची बिनविरोध निवड)

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)✍🏻 प्रविण घागरे ( मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- (दिनांक १४ फेब्रुवारी)मानवत तालुक्यातील हत्तलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचा शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले .

यावेळी शाळेत पालक सभेचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीस शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक पंढरीनाथ होगे यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला व समिचा निवडीचे निकष व कर्तव्य या बद्दल माहिती दिली तसेच प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांना व प्रत्येक समाजातील घटकांना प्रतिनिधित्व मिळेल व ५० टक्के महिला या समितीत राहतील असे आरक्षण सोडण्यात आले आहे.

त्यानंतर प्रत्येक सदस्य निवडण्यात आले सर्व सदस्यांची निवड ही एक मताने बिनविरोध करण्यात आली निवडलेल्या सदस्या मधून मागील शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडीबा शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी भगवान रामभाऊ शिंदे यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली,

तसेच सदस्यपदी शेख इमरान उस्मान, विनोद कारभारी शिंदे, सौ. सीमा अशोक तुपसमुंदर, विष्णू प्रकाश कापसे, सौ. सरस्वती विलास फुकाने, सुरेश नाथा तुपसमुंद्रे, सौ. रमा शिवाजी तुपसमुंद्रे, सौ. अनिता गंगाधर मोगरे, प्रताप साहेबराव कापसे, सौ. अरुणा त्र्यंबक, शिंदे सौ. आशामती भगवान पुकाने

व शिक्षण तज्ञ म्हणून माणिक आन्नासीराम शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून रुद्र कांचन शिंदे व ऋतुजा गणेश शिंदे स्थानिक स्वराज्य संस्था मधून सौ. छाया सुरेशराव शिंदे यांची निवड करण्यात आली शिक्षक प्रतिनिधी म्हणून एस. डी नेवरेकर यांची निवड करण्यात आली निवडीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य कृष्णा शिंदे,

शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सर्जेराव शिंदे, माऊली शिंदे, घनश्याम शिंदे, माणिक शिंदे, सुदर्शन माणिकराव शिंदे, विनोद शिंदे बालासाहेब तूपसमुंद्रे, गंगाधर मोगरे, सौ. स्वप्नना मिलिंद तूपसमुंद्रे, सौ. रेवता घनश्याम शिंदे यांच्या सह विद्यार्थ्याचे माता पालक प्रतिनिधी यांचे सर्वांचे अनमोल

असे सहकार्य लाभले ह्या निवडीसाठी शाळेतील शिक्षक जे. एस ठाकरे, व्ही. पी नेवरेकर, एच. डी. मुळे, श्रीमती डी. जी कालवीट, श्रीमती एस. आर गवळे शिक्षक मंडळीने परिश्रम घेतले शेवटी आभार शाळेचे मुख्याध्यापक तथा सचिव पंढरीनाथ होगे यांनी मानले.

शालेय समितीचे अध्यक्ष बिनविरोध व एक मताने ज्ञानेश्वर शिंदे तर उपाध्यक्ष म्हणून भगवान शिंदे व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!