एच. ए. आर. सी संस्थे तर्फे मानवत येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट व सीईटीची पुस्तके भेट

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)✍🏻 प्रविण घागरे (मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238
मानवत:- (दिनांक 14 फेब्रुवारी)जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय स्तर (आरएमएसए) वसतिगृहात इयत्ता 11 वी आणि 12 च्या व आर्थिक दृष्ट्या दुर्बल व एकल पालक व अनाथ विद्यार्थिनी राहतात.

विज्ञान शाखेची तसेच वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीट व कॉमन एन्ट्रन्स टेस्ट ची पुस्तके महाग असल्याने त्याना विकत घेणे शक्य होत नाहीत. त्यामुळे केवळ आर्थिक अडचणींमुळे ही विद्यार्थिनी वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा नीट व सीइटी च्या तयारीसाठी लागणाऱ्या अद्ययावत ज्ञानाचे भांडार असलेल्या पुस्तकांपासून वंचित राहू नये.
म्हणूनच होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एच. ए. आर. सी) संस्थेने नीट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुस्तकरूपी दान देण्याचे आवाहन केले. ज्यास पाथरी येथील मिताली विष्णुदास राठी, ऋतुजा तापडिया, मनस्विनी शिवा आयथळ व अनेक दात्यांनी प्रतिसाद दिला. कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय स्तर 4 मानवत येथे प्रत्यक्ष भेट देऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात एच. ए. आर. सी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक व संदीप भंडे, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सचिन चिद्रवार, कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय स्तर 4 च्या गृह प्रमुख सपना राऊत यांची उपस्थित होती.
एच. ए. आर. सी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांनी वैद्यकीय, फार्मसी, आयुर्वेद व होमिओ पॅथी या क्षेत्रातील विविध करियर संदर्भात मार्गदर्शन केले. या प्रसंगी कर सल्लागार श्री. संदीप भंडे यांनी वाणिज्य शाखा क्षेत्रातील विविध करिअरच्या संधी संदर्भात उपस्थितीत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा नीट व सीईटी ची एकूण 72 पुस्तके भेट दिली.
या ज्ञान भांडारात वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा नीट व सीईटीची भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आदी विषया वरील विज्ञान शाखेची स्टेट बोर्ड व एन. सीइ. आर. टीची पाठ्यपुस्तक, राजर्षी शाहू कॉलेज लातूर च्या नीटच्या नोट्स, एररलेस, एमटिजी नीट चा संच, नीट व सीईटी परीक्षेचे अद्ययावत प्रश्नावली संच आदी पुस्तके भेट दिली.
