उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

बस स्थानक उमरखेड येथे बॉम्ब कॉलची रंगीत तालीम

✒️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

उमरखेड (दिनांक १८ जानेवारी) जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याच्या किंवा बॉम्ब स्फोटाच्या प्रसंगी प्रसंगावधान राखुन करावयाच्या कार्यपध्दती संबंधाने यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक 18/01/2025 रोजीचे 12:30 ते 13:00 वा. दरम्यान बस स्थानक उमरखेड येथे बॉम्ब कॉलची रंगीत तालीम घेण्यात आली.

सदर तालीमेच्या अनुषंगाने उमरखेड येथील बस स्थानकाच्या वाहन पार्किंगमध्ये कोणीतरी अज्ञात ईसमाने घातपात करण्याच्या उद्देशाने बॉम्ब असलेली बॅग ठेवली आहे.

अशी माहीती पोलीस नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे मिळताच यवतमाळ जिल्हयातील पोलीस यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहचुन कोणतीही जिवितअथवा वित्त हानी होवु न देता बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच श्वान पथकाव्दारे संपुर्ण घटनास्थळाची घातपातविरोधी तपासणी करण्यात आली.

आणि सदर बाँम्ब असलेल्या बंगला बस स्थानकासमोरील निर्मनुष्यकेलेल्या ठिकाणी नेऊन सदर बॉम्ब हा डिफ्युज होणारा नसल्याने त्याचा ब्लास्ट करुन निकामी करण्यात आला.

त्यानंतर फॉरेन्सीक टिमच्या मार्फतीने घटनास्थळावरील भौतीक पुरावे जप्त करण्यात आले. सदर घटने दरम्यान थांबवुन ठेवलेली रस्त्यावरील गर्दी ही ट्राफिक पोलीसांच्या मदतीने सुरळीत करण्यात आली. त्यानंतर सदरचीकार्यवाही ही पोलीस विभागातर्फेच घेण्यात आलेली एक मॉक ड्रिल असल्याचे मेगा फोनव्दारे नागरिकांना सांगीतले.

सदरची रंगीत तालीम (मॉक ड्रील) श्री. कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळ, श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री. हनुमंत गायकवाड, SDPO, उमरखेड, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड, सपोनि.सारंग बोम्पीलवार, प्रमुख, दहशतवाद विरोधी शाखा, पोउपनि उल्हास परांडे, बॉम्ब शोधक व नाशक पथक, पोउपनि संजय धवणे, प्रमुख QRT पथक व RCP पथक, सपोनि रोहीत बेंबरे वाहतुक शाखा, उपविभाग उमरखेड, सपोनि ज्ञानेश्वर मुंडाले अंगुलीमुद्रा विभाग, पोहवा अमित मेश्राम, शा. फोटोग्राफर, वैदयकीय अधिकारी, अग्निशामक दल यांनी केली.

एखादा बॉम्ब हल्ला अथवा दहशतवादी हल्ला झाल्यास पोलीसांनी काय करावे तसेच नागरीकांनी प्रसंगावधान राखुन काय काळजी घ्यायला पाहीजे.

याबाबत सदर रंगीत तालीमव्दारे प्रात्यक्षीक करुन दर्शविण्यात आले तसेच नागरीकांनी जागरुक राहुन दहशतवादासंबंधी काहीही माहीती असल्यास नियंत्रण कक्ष यवतमाळ येथे फो.नं. 07232-242700 व डायल 112 वर संपर्क करुन कळवावे असे आव्हान यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!