उमरखेडमहाराष्ट्रविशेषसामाजिक

मिलिंद महाविघालयात स्मृतिपर्व साजरे

✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक)

🖊️ सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर उपसंपादक)

उमरखेड: – (दिनांक ९ डिसेंबर)तालुक्यातील मुळावा येथील महाविघालयात क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांची पुण्यतिथी व संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण दिवस स्मृती पर्व म्हणून साजरे करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथपाल डॉ राहूल धुळधुळे तर मागदर्शन म्हणून प्रख्यात साहित्यिक तथा मराठी विभाग प्रमुख डॉ अनिल काळबांडे, पालीविभाग प्रमुख प्रा क्रांती मुनेश्वर राज्यशास्र विभाग प्रमुख प्रा ज्योती खंदारे ह्या होत्या.

डॉ. काळबांडे यांनी गुरु आणि शिष्य यांच्या विचारातील कृतीतील समानता सांगून महात्मा जोतीराव फुले हे आधुनिक भारताचे शिल्पकार तर डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार कसे होते.

हे उदाहरणासह सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ.धुळधुळे यांनी दोनही महापुरषांचा समग्र इतिहास विद्यार्थ्याना सांगीतला कार्यक्रमाने प्रास्ताविक व आयोजन रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा ज्योती खंदारे यांनी सांगून, दोनही महापुरुषांनी स्रि सवातंत्र्यासाठी दिलेला लढा व त्यांच्यामुळे महिलांची प्रत्येक क्षेत्रात होणारी नेत्रदिपक कामगीरी या वर प्रकाश टाकले.

यावेळी प्रज्वल देशमुख अंकिता मनवर वैष्णवी मनवर क्रांती कांबळे सुजाता काशिंदे सानिका उबाळे वैष्णवी ठाकरे पवन कांबळे सह मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन आशिष सुरोशे आभार लक्ष्मण चंद्रवंशी यांनी केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!