उमरखेडमहाराष्ट्रविशेषशहर

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमएमपीजे व एपीसीआर संघटनेचा उपक्रम

सविधान जागृती अभियान

✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (उपसंपादक)

उमरखेड:- (दिनांक 8 डिसेंबर) एमपीजे संघटने तर्फे राज्यव्यापी अभियान संविधान सर्वासाठी बंधुता अभियान 26 नोव्हे संविधान दिवस ते 26 जाने प्रजासत्ताक दिना पर्यंत राबविण्यात येत असलेल्या अभियाना अंतर्गत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त मुव्हमेन्ट फॉर पीस ॲन्ड जस्टीस (एमपीजे)

तसेच कायदे विषयक लोकांना न्यायीक मार्गदर्शन करणाऱ्या असोसिएशन फॉर प्रोट्रेक्शन फॉर सिव्हील राईट्स (एपीसीआर) या संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 10 डिसेंबर रोजी रात्री 8:15 वाजता अल हुदा प्रिप्रायमरी स्कुल तातारशहा वार्ड उमरखेड येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रात्री ८ वाजता सुरू होईल.

या कार्यक्रमात मानवाधिकारांचे महत्त्व आणि त्यांच्याविषयी जागरूकता वाढवण्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच संविधान जन जागृती संविधानाला अभिप्रेत बंधुता अश विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहेत.

मानवी हक्कांबाबत जागरुकता वाढावी आणि समाजात त्यांचे महत्त्व समजावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेने एका प्रसिद्धी पत्रका व्दारे जाहीर केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!