गावंडे महाविद्यालयात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अंतर्गत पथनाट्य
✍️बबलु भालेराव (मुख्य संपादक)
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (उपसंपादक)


उमरखेड (दि. 10 डिसेबर) गो. सी. गावंडे वरिष्ठ महाविद्यालयत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या मार्फत स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांचे कडून पथनाट्य सादरीकरण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना कचरा मुक्त शहरे, कचऱ्याचे वर्गीकरण, प्लास्टिकचा वापर न करता करणे व स्वच्छता नियमांचे ज्ञान त्यासोबतच निरोगी जीवनाचे वरदान, याबद्दल माहिती देण्यात आली.

पथनाट्यद्वारे कचऱ्याचे वर्गीकरण करणे सुका कचरा वेगळा करणे घातक, कचरा वेगळा करणे, ओला कचरा वेगळा ठेवणे, घंटागाडी व त्यांचे अभियान त्यासोबतच, कापडी पिशवीचा वापर करणे घनकचरा व्यवस्थापन याबद्दल माहिती देण्यात आली.

घरांची, गावांची, परिसराची व पर्यायाने देशाचीही स्वच्छता व्हावी व सर्वसामान्य जनतेचे आरोग्य मानव पर्यार्याने जीवनमान उंचवावे व त्यायोगे “स्वच्छतेतून समृध्दीकडे” हे संकल्पना मूर्तरुपात येणे अपेक्षित आहे.

तसेच पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृद्ध व संपन्न परिसर, गाव व पर्यायाने देशाची निर्मिती करणेही काळाची गरज असल्याने जल, जमीन, जंगल, हवा, वनस्पती इ. चे योग्य व्यवस्थापन करुन भौतिक सोयी – सुविधांची निर्मिती “पर्यावरण संतुलन” ठेऊन केल्यास नागरीकांचे जीवनमान, दर्जा सुधारण्यास मदत होईल, त्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकांमध्ये खोलवर रुजण्याची नितांत आवश्यकता आहे.

पथनाट्य सादरीकरणासाठी नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सहभागी कलाकार श्री. महेंद्र चक्रे, श्री. आशिष वानखेडे, रवीना श्रीरामे, समीक्षा खोब्रागडे, दिनेश बनसोड, सचिन वानखडे व सुमित डोंगरदिवे यांनी उत्कृष्ट कला सादर केली व कचरा व्यवस्थापन व स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन केले.

पथनाट्य व सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. डॉ.बी. एम. सावरकर, प्रा. संदीप चेडे व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.
