Uncategorized

उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक लक्ष्मण कांबळे यांनी अपक्ष नामांकन दाखल

✍️बबलू भालेराव मुख्य संपादक मो.9637107518

उमरखेड (दिनांक 31 ऑक्टोंबर) राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पार्टीने उमेदवारी न दिल्यामुळे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक कांबळे यांनी अपक्ष उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केला.

नमस्कार अर्ज दाखल करणे वेळी उमरखेड महागाव परिसरातील हजारोच्या संख्येने लोक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जमा होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गायत्री चौक या ठिकाणी माहेश्वरी जी स्वर्गवासी माहेश्वरी यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅली तहसील मार्गाने काढली.

ह्या रॅली दरम्यान उमरखेड महागाव तालुका परिसरातील देवा प्रकाश राठोड पवार सर अकॅडमी प्रमुख धीरज पवार सर तसेच ईसापुर येथील कैलास मोरे पळशी येथील डीएन कदम येथील भालेराव, दामोदर जी तसेच राजुरा येथील अशोकराव गायकवाड तसेच भोसा,तीव्रंग, हिवरा महागाव मुडाणा घाणमोक वडद मोदरी आडत पिंपळदरी मुळावा जानकी निग्नोर बिटरगाव या परिसरातील संख्येने जनसमुदाय हजर होता सदर अर्ज माननीय उपविभागीय दंडाधिकारी साहेब निवडणूक निर्णय अधिकारी उमरखेड यांना दाखल करण्यात आला जनतेची सेवा करण्यासाठी मी पोलिसातील माणूस दीपक कांबळे यांनी मागील पंचवीस वर्षे सेवा केल्याने या परिसरात सर्वसामान्य समस्या सोडविण्यासाठी परिसरातील शेतकरी कष्टकारी मजूर या सर्वांच्या मागण्या रेटून धरण्यासाठी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी तसेच परिसरातील कर्मचाऱ्यांचे अडचणी गोरगरिबाच्या अडचणी दूर करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगितले उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी त्यांच्यावर झालेला अन्याय दूर व्हावा समाजावर होणार अन्याय दूर करावा याकरिता व जनतेला संरक्षण मिळावे.

याकरिता पोलिसातील माणूस म्हणून यांनी जी सेवा केली. त्या सेवेच्या भरोशावर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज करता दाखल करताना सेवानिवृत्त माजी सैनिक संघटना यांच्या कर्मचारीरॅली दरम्यान सेवानिवृत्त सैनिक श्री मिलिंद बर्डे हे सुद्धा उपस्थित होते.

सेवानिवृत्त कर्मचारी काळबांडे सर, शामभाऊ धुळे, शिवानंद पोलीस अधिकारी आठवले, बहादुरे, इंगोले, मेंढे, चकलेवार व तसेच गावातील इतर सेवानिवृत्त कर्मचारी गिरी सर व या परिसरातील या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी रस्त्याने जाताना त्यांचे हार घालून अनेक ठिकाणी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!