ताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्रविशेषसामाजिक

हदगाव तालुक्यातील ल्याहरी येथील अनाथ कु. दैवशाला गिरबिडे या लेकीला रयत सेवाभावी प्रतिष्ठान चा आर्थिक मदतीचा हात

[सर्व दानशूर दात्यांच्या सहकार्याने जमा झालेली 25100 रुपयाची मदत]

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

हदगाव (दिनांक 28 जून) रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव ता. हिमायतनगर जि. नांदेड तर्फे आज ल्याहरी येथील अनाथ कु. दैवशाला नागोराव गिरबीडे या लेकीला सर्व दानशूर दात्यांच्या सहकार्याने जमा झालेली मदत आज घरपोच ल्याहरी येथे देण्यात आली.दैवशाला गिरबीडे यांची अतिशय बिकट परिस्थितीत आजारी असून सुद्धा दैवशालाने दहावी ला चांगले गुण घेऊन या वर्षी पास झाली आहे.

पावसाळ्यात पत्राच्या छिद्रातून पावसाचे पाणी घरात शिरते ते दैवशालाचे घर, आजी व दैवशाला ला प्रत्यक्ष बघितल्यावर तुमच्या डोळ्यातून अश्रुंच्या धारा वाहिल्याशिवाय राहणार नाहीत.

यावेळी संस्थापक अध्यक्ष सटवाजी पवार सर जवळगावकर, सदस्य राजू पांडे सर हदगाव, निवृत्तीराव वानखेडे मामा मानवाडीकर, गजानन अनंतवार सर कवानेकर, गोपाळराव पाटील कोळगावकर , गौतमदादा वाठोरे सर पत्रकार, बोईनवाड सरपंच, सौ. अश्विनी गिरी मॅडम सदस्या, स्वप्निल पाडाळकर, शुभम पाडाळकर, विठ्ठल गायकवाड, अविनाश माने, उमेश सावतकर, शंकर वानखेडे, गौतम शिगणकर गावातील प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी बालक बालिका यांच्या सह असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत मदत देण्यात आली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!