राजुरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी!
✍️सिद्धार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

महागाव – १४ एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मौजे राजुरा येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. याप्रंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कवी,लेखक,साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सुधाकरराव लोमटे सर व सागर घुगरे सर उपस्थित होते.

भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस सुधाकर लोमटे सर यांच्या हस्ते पुष्पपूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.तसेच गावातील सरपंच गजानन दिलीपराव बुडाळ,पोलीस पाटील गजानन ठाकरे,तंटामुक्त अध्यक्ष कानबाराव काचगुंडे, सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ जी ठाकरे,ज्येष्ठ व्यक्ती माधवरावजी बुडाळ पाटील, तक्षशिला बहुउद्देशीय संस्थेला एक प्लॉट दान करणारे अशोकरावजी पांडुरंग गायकवाड,तक्षशिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आकाश गायकवाड,उपाध्यक्ष अमित खडसे व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

त्याप्रसंगी गावातील चिमुकल्या मुलींनी भाषणे केली.त्यामध्ये प्रथम कुमारी साक्षी रामराव खडसे,स्नेहल रामराव खडसे, आराध्या गौतम खडसे,प्रज्ञा तुकाराम खडसे,स्वरांजली भारत खडसे,अश्विनी संतोष लोखंडे व गावातील पोलीस भरतीमध्ये दाखल झालेला तरुण समाधान दिगंबर मेंडके यांचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय सुधाकर लोमटे सर यांच्या हस्ते करण्यात आला. त्रिशरण व पंचशील आनंद गवई खडसे व प्रकाश अशोक गायकवाड यांनी वंदना घेतली.

याप्रसंगी बौद्ध बांधवांसह गावातील सर्व जाती धर्माचे समाज बांधव उपस्थित होते.
