Uncategorized

सख्या बहिण-भावाचा मृत्यू

पोहण्याचा मोह बेतला जिवावर : लेआऊटचा खड्डा ठरला काळ दारव्हा : पाण्यानेभरलेल्या एका खड्यात बुडून दोन निष्पाप चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना तालुक्यातील महागाव कसबा येथील साईनगरी लेआऊटमध्ये आज बुधवार, (दि. १) येथे उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

प्रियांका गणेश राठोड (वय १० वर्षे) व कार्तिक गणेश राठोड (क्य ८ वर्षे) असे मृतक बहिण-भावाचे नाव आहेत.दारव्हा आणी रोडला लागून असलेल्या या लेआऊटमध्ये दहा फूट खोल खट्टे खोदण्यातआले होते, या गड्डयांमध्ये पाणी साच ल्याने तेथे दोन लहान मुले पोहण्यासाठी गेल्याने सांगितले जाते. मात्र, पोहम्याचा प्रयत्न करतांना दोघेही पाण्यात बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. ३० सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत

अंदाजे दहा फूट खोल गड्ढे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. निष्काळजीपणामुळे निष्पाप जीव गमवावे लागणे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी त्वरित या धोकादायक खड्यांभोवती सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Oplus_131072

मुले घरी परतली नसल्याने पालकांनी शोध घे ण्यास सुरुवात केली. मात्र ती सापडली नाहीत. बुधवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहितीमिळताब नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अशा धोकादायक गड्यांवर त्वरित सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!