शालेय शिक्षण समितीचा शिक्षण सल्लागार पदी प्रविण बेले यांची निवड; निवडी बद्दल संस्थेच्या वतीने सत्कार

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238
मानवत:- (दिनांक ०२ जानेवारी)शालेय शिक्षण समितीचा शिक्षण सल्लागारपदी नुकतीच प्रविण बेले यांची निवड करण्यात आली.निवडी बद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

मानवत येथील सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयामध्ये ०१ जानेवारी रोजी संस्था अध्यक्ष मा. विजयकुमारजी कत्रुवार, मुख्याध्यापक विश्वभूषण ओ. इंगोले, मुख्याध्यापक पी. एम. कजेवाड पर्यवेक्षक विलास शिंदे व सर्व शिक्षक व शिक्षके त्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत श्री प्रविण नरहर राव बेले याचा सत्कार करण्यात आला.

दि.२७ डिसेंबर रोजीच्या पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ मानवत कार्यकारणी बैठकीमध्ये सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मानवत व श्रीमती शकुंतलाबाई कांचनराव कत्रुवार विद्यालय मानवत च्या शालेय समिती वरती सेवा निवृत्त मुख्याध्यापक श्री.प्रवीण नरहरराव बेले यांची शिक्षण सल्लागार म्हणून अधिकृतरित्या सर्वानु मते ठराव घेण्यात येऊन निवड करण्यात आली.

या निवडीमुळे उत्कृष्ट प्रशासन अभ्यासा मुळे नक्कीच विद्यालयाच्या प्रगती होण्यास मदत होईल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.
