उमरखेडमहाराष्ट्रशैक्षणिक

भारताचं विद्यापीठ – रमाई महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन संपन्न..!

उमरखेड

✒️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466

✒️ बबलू भालेराव (मुख्य संपादक) मो.9922870518

उमरखेड :- शब्ददान प्रकाशनाच्या वतीने त्यागमुर्ती रमाईच्या जीवनावर काढलेल्या भारताचं विद्यापीठ-रमाई या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन रविवार दिनांक १०/११/२०२४ रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी स्थानिक महिलांच्या हस्ते करण्यात आले.या महाकाव्यग्रंथ प्रकाशनाचा सोहळा स्थानिक उमरखेड शहरात सुमेध बोधी बुद्ध विहारात व सम्यक बुद्ध विहार या दोन्ही विहारात संपन्न झाला.

यावेळी पुस्तकाचे प्रकाशन धम उपासिका उषाताई संतोष इंगोले अध्यक्ष (रमा माता महिला मंडळ उमरखेड), भारतीताई केंद्रेकर,भारताबाई दिवेकर, सिध्दार्थ दिवेकर पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले.सुमित बोधी बुद्ध विहार येथील विचारमंचावर आयु.गयाबाई सुभाष वाठोरे, केशरबाई परसराम पाईकराव, मायाबाई आत्माराम हापसे, चित्रलेखा भीमराव इंगोले उपस्थित होत्या.

तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांच्या पुष्प पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर विचारमंचावर उपस्थित मान्यवर महिलांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

यावेळी आयु.केशरबाई परसराम पाईकराव , आयु. मायाबाई आत्माराम हापसे, आयु.चित्रलेखा भीमराव इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयु.गयाबाई सुभाष वाठोरे यांच्या शुभ हस्ते भारताचं विद्यापीठ -रमाई या महाकाव्य ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आत्माराम हापसे,माधवराव पडघने, लक्ष्मणराव हापसे, अविनाश सोनुले, इंदुबाई लोमटे, रंजनाबाई आळने,भालचंद्र लोमटे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.शब्ददान प्रकाशनाच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक सुधाकर लोमटे व कविवर्य प्राचार्य शाम रोकडे यांनी प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!