www.google.comउमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यानिवडमहाराष्ट्रयवतमाळशहरशैक्षणिकसामाजिक

शहीद भगतसिंग नगर परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्र. २, उमरखेड येथील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश!

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड (प्रतिनिधी): शहीद भगतसिंग नगर परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्र. २, उमरखेड येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा लावला आहे.यामध्ये इयत्ता चौथीतील रुद्र मडके व इयत्ता सातवीतील स्वप्नील चव्हाण यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून शाळेचा गौरव वाढविला.या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री आशिष राठोड यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले. तसेच सौ. अंजली राजपूत मॅडम, श्री संदीप साळवे सर व श्री अंकुश राजे सर यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्ग, अतिरिक्त सराव चाचण्या व नियमित अभ्यासाचे नियोजन करून परिश्रमपूर्वक तयारी करून घेतली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरित करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने दोन्ही विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी भर पडली असून इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांकडे प्रेरणा मिळाली आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button