उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

उमरखेड नगरपरिषदेचा ‘अंधेर’ कारभार! डॉ. आंबेडकर वार्डात पुन्हा काळोख; तक्रारींची कचराकुंडी?

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड:- (दिनांक 9 मे) प्रशासकीय उदासीनता आणि लोकप्रतिनिधी आणि नगराध्यक्षा यांच्या दुर्लक्षामुळे उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड पुन्हा एकदा अंधारात बुडाला आहे. मागील 11 एप्रिलपासून येथील सम्यक बुद्ध परिसरातील स्ट्रीट लाईटचा लपंडाव सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. •नेमकी अडचण काय? मिळालेल्या माहितीनुसार, या भागात एक दिवस पथदिवे सुरू राहतात आणि त्यानंतर सलग 3 – 4 दिवस बंद असतात. यामुळे रात्रीच्या वेळी परिसरात पूर्णपणे अंधार पसरतो, ज्याचा फायदा असामाजिक तत्वांना होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.


•अधिकारी आणि नगरसेवकांचे दुर्लक्ष:- नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासन ढिम्म हलण्यास तयार नाही. संबंधित कर्मचारी शिंदे आणि अभियंता राठोड हे सहकार्य करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप संतापलेल्या नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे, प्रभागाच्या दोन्ही नगरसेवकांना परिस्थितीची कल्पना देऊनही त्यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.


•नागरिकांची मागणी:
“आम्ही वारंवार सांगूनही दखल घेतली जात नसेल, तर संबंधित कर्मचारी आणि अभियंत्याची चौकशी झालीच पाहिजे. वेळेत सेवा न देणाऱ्यांवर कडक कारवाई करा,” अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी ‘महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल’च्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.

चौकट – दिनांक: ११ एप्रिलपासून समस्या कायम. प्रभाग: डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड (सम्यक बुद्ध परिसर). तक्रार: एक दिवस प्रकाश, चार दिवस अंधार!
दोषी: नगरपरिषद उमरखेडचे संबंधित विभाग आणि सुस्त लोकप्रतिनिधी. नागरिकांचा सवाल: “कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरपरिषद मुहूर्त शोधत आहे का?”

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!