उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

बिटरगाव पोलिसांची मोठी कारवाई; ढाणकीत गांजा सेवन करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल

✍🏻 करण भरणे (बिटरगाव/ढाणकी प्रतिनिधी)

बिटरगाव/ढाणकी:- राज्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असतानाच, बिटरगाव पोलिसांनी ढाणकी परिसरात एक धडाकेबाज कारवाई केली आहे. ढाणकी येथील जयस्वाल देशी दारू दुकानासमोरील मोकळ्या जागेत गांजा ओढणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्यावर ‘एनडीपीएस’ (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ढाणकी येथील जयस्वाल देशी दारू दुकानाच्या समोरील परिसरात काही तरुण अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची माहिती बिटरगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन चे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या पथकाने तातडीने सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी त्या मोकळ्या जागेत पाच इसम नामे 1) शंकर चंपत कांबळे वय 55 वर्ष 2) रितेश दिलीप मुनेश्वर वय 26 वर्ष. 3) गजानन चांदु गोरेकर वय 31 वर्ष. 4) रितेश संजय मुकीरवार वय 30 वर्ष 5) शरद बापूराव खाडे वय 31 वर्ष सर्व रा. ढाणकी ता. उमरखेड हे गांजा या अमली पदार्थाचे चिलीमच्या साह्याने सेवन करताना आढळून आले.

पोलिसांची कारवाई: पोलिसांनी धाड टाकली असता, पाचही इसम नशेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून गांजा व ओढण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी बिटरगाव पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा (NDPS Act) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

परिसरात खळबळ: ढाणकी सारख्या शहराच्या ठिकाणी अशा प्रकारे दिवसाढवळ्या अमली पदार्थांचे सेवन होत असल्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

अमली पदार्थ विक्री करणाऱ्या किंवा सेवन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी दिला आहे. सदर कारवाई बिटरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पांडुरंग शिंदे, नापोका/2071 मोहन चाटे, pc/69 सुदर्शन जाधव, pc/952 प्रवीण जाधव , pc/2420 राजू बेलेवार, pc/731 शिवाजी शिंदे, pc/1022 शरद चव्हाण, चालक HC/2232 राहुल कोकरे या पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास बिटरगाव पोलीस करत आहेत.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!