ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

भीम आर्मीचा दणका: पुसद नगरपरिषद उपाध्यक्ष कार्यालयात महामानवांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना!

✍🏻 सिद्धार्थ दिवेकर (सह संपादक) मो.9823995466

पुसद – येथील नगरपरिषदेमध्ये एका वेगळ्याच प्रकारच्या अन्यायाविरुद्ध भीम आर्मीने आक्रमक पवित्रा घेतला. नगरपरिषद उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात गेल्यानंतर तिथे संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा नसल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता.

‘राजकीय नेत्यांपेक्षा महामानव मोठे’ भीम आर्मीच्या वतीने उपाध्यक्ष “हे कार्यालय कोणत्या राजकीय नेत्याचे खाजगी दुकान नसून संविधानिक पदावर बसणाऱ्या व्यक्तीचे आहे. कोणताही राजकीय नेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा मोठा नाही,” अशा शब्दांत अशोक भालेराव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रतिमांची स्थापना केवळ मागणी करून न थांबता, भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी बसून सन्मानाने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमा लावल्या. तसेच, उपाध्यक्ष यांना भारतीय संविधानाची प्रत भेट देऊन कर्तव्याची जाणीव करून दिली.

यावेळी भीम आर्मीचे पदाधिकारी अशोक भालेराव यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!