ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळविशेषशहरसामाजिक

भीम आर्मी व आझाद समाज पार्टी यांच्या कडून पुसद मध्ये उपवर्गीकरणाविरोधात तीव्र आंदोलन

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

पुसद – अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज तीव्र आंदोलन करण्यात आले. भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद खासदार उत्तर प्रदेश व भीम आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग, व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक जी कांबळे यांच्या आदेशाने आंदोलनादरम्यान भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अशोकराव भालेराव यांनी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अन्यथा पूर्ण महाराष्ट्र मध्ये आंदोलन केल्या जाईल संविधानाच्या अनुच्छेद 341 नुसार अनुसूचित जातीची यादी एक संघ आहे राज्य सरकारांना त्यात उप वर्गीकरण करून या जातीला जास्त त्या जातीला कमी असं ठरवण्याचा अधिकार नाही तरीसुद्धा महाराष्ट्र सरकार कायद्याचे उल्लंघन करीत आहे हे कदापि मान्य केले जाणार नाही असे मत अशोक भालेराव यांनी व्यक्त केले आणि या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या व आपला संताप व्यक्त केला.

यानंतर आजाद समाज पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत यांनी सुद्धा आज गरज आहे हक्क टिकवण्याची एकजूट मजबूत करण्याची आणि संविधानाचा मूळ हेतू समजून सांगण्याची आझाद समाज पार्टीचे जिल्हा महासचिव विशाल भाऊ डाके यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र सरकार यांना खडे बोल सुनावले कशाच्या आधारावर तुम्ही आरक्षणचे विभाजन करीत आहात असे गंभीर प्रश्न त्यांनी आपल्या भाषणा मध्ये व्यक्त केले आंदोलकांच्या वतीने मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनामध्ये उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा तसेच संबंधित समितीचा अहवाल त्वरित सार्वजनिक करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.आंदोलकांनी नमूद केले की, सदर निर्णय सामाजिक न्याय व भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना बाधा आणणारा असून, यामुळे समाजात फूट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अशोकराव भालेराव, राजकुमार भगत आजाद समाज पार्टी कां. युवा जिल्हाध्यक्ष यवतमाळ, विशाल डाके आजाद समाज पार्टी कां. युवा जिल्हासचिव यवतमाळ, , राहूल धुळे, वैभव खरतडे, वैभव सूर्यवंशी, करण खंदारे, राहुल पडघने, गजानन पडघणे, शांतीसिंग जाधव, शुभम ढोले, दीपक कांबळे, अनिकेत खरतडे, भीमराव पडणे, देवराव पाईकराव, राहुल पाईकराव, बाळासाहेब चोपडे, करण खंदारे, आकाश चवरे, प्रकाश पडणे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!