उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषशहरसामाजिक

उमरखेड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी.

🚨(हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत निघाली भव्य मिरवणूक; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल)

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

उमरखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. तसेच मिरवणूक रॅली ही डीजे मुक्त साजरी करण्यात आली.या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवत ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन जयंतीचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने ११ एप्रिल ते १३ एप्रिल दरम्यान विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक कार्यक्रम:- समाजातील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. विविध स्पर्धा: लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना प्रोत्साहित करण्यात आले.

भव्य मिरवणूक आणि जनसमुदाय जयंतीच्या मुख्य दिवशी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. निळ्या निशाणांच्या सावलीत आणि डॉ. बाबासाहेबांच्या जयघोषात निघालेल्या या रॅलीमध्ये अबालवृद्धांसह महिला व तरुणांचा मोठा सहभाग होता.

या मिरवणुकीने संपूर्ण उमरखेड शहराचे लक्ष वेधून घेतले.समितीचे यशस्वी नियोजनया भव्य सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.

यामध्ये जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष:योगेश दिवेकर, उपाध्यक्ष आकाश श्रवले, ऋषिकेश पाईकराव, आकाश पाईकराव, कुमार केंद्रेकर,अमोल दिवेकर, तुषार पाईकराव, संतोष इंगोले, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर यांच्यासह अनेक भीमसैनिकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीचे आणि कार्यक्रमांचे नियोजन केले होते. या सोहळ्यामुळे परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!