
जयंतीची वाट पहातोय आम्ही बाबा तुमच्या जयंतीची वाट पहातोय आम्ही कारण आम्हाला मोठं व्हायचं आहे.

खांद्यावर निळे शेले टाकत जयभीमचा जयघोष करून त्यागी जीवनाचा आदर्श सांगतनाच गाण्यात मश्गूल होऊनशिलसंपंन्न चारित्र्याचे धडे देत काचेचा ग्लास हाती घेऊन कडक स्वभाव आणि पोशाख बघत आतून काळे असलेल्या शरीरावर शुभ्र झुल चढवून आम्हाला मोठं व्हायचंय बाबा! आत्ता तर आम्ही बॅनर वर आमचा मोठ्ठा फोटो लावून मोठ्ठ व्हायचं ठरवलंय बाबा… बॅनर ने स्मारक झाकून आमच्या सारख्या कमी उंचीच्या माणसाने खूप मोठ्ठं व्हायच ठरवलंय बाबा… आम्ही तुमच्या जयंतीची आतुरतेने वाट पहातोय बाबा! पण एक प्रश्न मनाला पडलायया आधीची माणसं खूप मोठी झालेली बघितलीत आम्हीतुझ्या क्रांतिकारी विचारांना फॉलो करून! – कवी सुधाकर लोमटे सर

कवी सुधाकर लोमटे उमरखेड

