उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

त्यागाचे मूर्तीमंत रूप म्हणजे रमाई – प्रोफेसर अनिल काळबांडे

✍🏻बबलू भालेराव (मुख्य संपादक)

उमरखेड:- हिमालयासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण आयुष्यात रमाई ही सावली सारखी सोबत राहीली कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने काटकसर करीत संसाराचा गाडा ओढणारी रमाई म्हणजे त्यागाचे मूर्तिमंत रूप असल्याचे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रोफेसर डॉ.अनिल काळबांडे यांनी केले ते तालुक्यातील बेलखेड येथे आयोजित रमाई जयंती सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक नामदेवराव शिंगणकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विजयानंद शिंगणकर, डी .बी .शिंगणकर ‘ नामदेव काळबांडे, मुकिंदा शिंगणकर हे होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाचा प्रतिमेचे पुजन करून उपस्थितांना सामूहिक त्रिशरणा सह पंचशील डी बी शिंगणकर यांनी त्यानंतर भाग्यश्री सिंगणकर हिने रमाई गीत गायले. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात डॉ . काळबांडे यांनी, रमाईचा संघर्षमय इतिहास सांगून रमाईचा आदर्श सर्वांनी घेण्याचा आवाहन केले.

बाबासाहेब बॅरिस्टर झाल्यानंतर बाबासाहेबांना परदेशातून परत भारतात येण्यासाठी पैसे नसल्याने बाबासाहेब रमाईला तार करतात तेव्हा रमाई गोबऱ्या , कोळशे विकून बाबासाहेबांना पैसे पाठवते .तेव्हा कुठे बॅरिस्टर झालेले बाबासाहेब परत भारतात येतात. साध्या भोळ्या रमाईच्या त्यागातून, कर्तृत्वातून कसे घडत जातात हे उदाहरण देऊन त्यांनी समजावून सांगितले . रमाईचा आदर्श घेऊन महिला मंडळांनी सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये त्याग , बचत ,काटकसर करून रमाईचा आदर्श जोपासण्याचे या वेळेस आव्हान केले.

या कार्यक्रमाला राजू शिंगणकर ,यादव शिंगणकर ,बुद्ध सागर शिंगणकर, महेश काळबांडे , अक्षय शिंगणकर, अक्षय अशोक शिंगणकर, धम्मदीप शिंगणकर ,बालाजी शिंगणकर ,गयाबाई बहादुरे , लक्ष्मीबाई शिंगणकर, गयाबाई सिंगणकर, रंजनाबाई पाईकराव ,जिजाबाई शिंगणकर सुमनबाई काळबांडे , शांताबाई पाईकराव , प्रजावंती पाईकराव ,भगवान शिंगणकर उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमशाहीर सुभाष शिंगणकर यांनी केले तर प्रास्ताविक मुकुंदा शिंगणकर यांनी केले .आभार भगवान शिंगणकर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी जि प शाळा, ज्ञानदिप शाळेचे कर्मचारी वृंद, महिला मंडळ प्रामुख्याने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!