उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

पंतप्रधान आवास योजनेतून जाणीवपूर्वक नाव गहाळ केलेधनज ग्रामपंचायत मधील प्रकार; मारोती मोडक यांची शंभर रुपयांच्या बॉण्डवर गटविकास अधिकाऱ्याकडे तक्रार

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड :- तालुक्यातील ग्रामपंचायत धनज मधील मारोती खंडू मोडक या लाभार्थ्याचे नाव पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जाणीवपूर्वक कमी करून आवास योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार झाला असून याबाबतची तक्रार लाभार्थ्याने गटविकास अधिकारी यांना शंभर रुपयांच्या बॉण्डवर लेखी स्वरूपात दिली आहे.

पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी मारोती खंडू मोडक हे मौजे धनजचे रहिवासी असून त्यांना आवास योजनेअंतर्गत यादी क्रमांक 6 ड मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यानुसार लाभार्थ्याने योग्य त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता ग्रामपंचायत मध्ये केली. घरकुला विषयी ग्रामपंचायत सचिव, सरपंच व सदस्य व संबंधित पदाधिकारी यांना लाभार्थ्यांनी वारंवार विचारपूस केली पण त्यांना उडवा उडवीची उत्तरे मिळाली. पात्र असताना सुद्धा जाणून-बुजून डावलण्यात आले.

पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल बांधकाम करत असताना जिओ टॅग करणे आवश्यक आहे असे असले तरी सदर काम करणारे अभियंता अविनाश आडे यांनी काही लाभार्थ्यांचे बांधकाम झालेले नसताना सुद्धा आर्थिक देवाणघेवाणीतून घरकुल ची पूर्ण रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात देण्यात आल्याचा प्रकार सुद्धा झाला आहे, इतर पात्र लाभार्थ्यांच्या तसेच ज्या लाभार्थ्यांनी कोणतेही बांधकाम केलेले नसताना सुद्धा लाभ घेतला अशा लाभार्थ्यांची चौकशी करण्याची गरज असल्याचे मोडक यांनी निवेदनातून म्हटले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!