उमरखेडक्राइम गुन्हाताज्या बातम्याभीम टायगर सेनामहाराष्ट्रसामाजिक

महापुरुषाबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करा!

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड – शहरातून एक मोठी आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी समाज माध्यमांवर अश्लील आणि आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

या संदर्भात उमरखेड येथील सर्व समाज बांधवांनी पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन उमरखेड यांना लेखी निवेदन देत तीव्र निषेध व्यक्त केला आहे.निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, काही दिवसांपासून सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानास्पद आणि अश्लील पोस्ट केल्या जात आहेत. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असून अशा समाजकंटकावर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच जर संबंधित व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर उमरखेड बंदची हाक देण्यात येईल, असा इशाराही भीम टायगर संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे, तालुका अध्यक्ष कैलास दादा कदम, पत्रकार दत्ता काळे, पत्रकार प्रसेनजीत दिवेकर, ईश्वर गोस्वामी इत्यादी अनेक समाज बांधवांनी दिला आहे. या वेळी भीम टायगर संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष श्याम धुळे व सर्व समज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या प्रकरणात पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे संपूर्ण उमरखेड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!