तहसील कार्यालयातील प्रलंबित शेत रस्ता प्रकरणे तातडीने निकाली काढा
(शिव पानंद शेत रस्ता कृती समितीची मानवत तहसीलदार यांच्या कडे मागणी)
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238
मानवत (दिनांक ०६ जानेवारी)तहसील कार्यालयात असलेली प्रलंबित शेतरस्ता प्रकरणे प्रसासनाने तातडीने निकाली काढावेत या सह विविध मागण्या शिवपानंद शेत रस्ता कृती समितीचा वतीने ०६ जानेवारी रोजी मानवत तहसीलदार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

या यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी शेतामधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धे मुळे यांत्रिकी करणही परिहार्य बाब झाली आहे.
शेतमाल बाजारात पोहोचवण्या करता पेरणी अंतर्गत मशागत कापणी मळणी या स्वरूपाची यंत्र सामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेती पुरक उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही परिहार्य बाब झाली आहे.

शेतीमाल बाजारात व्यवसाय, सर्प दंश वीज पडणे पुर येने, आग लागणे या स्वरू पाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याच बरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यात असून, शेतमाल बाजारपेठेत पोचवण्या सोबतच विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना दळणवळणासाठी बारा माही दर्जेदार शेतरस्त्याची आवश्य कता असुन या बाबत तहसील प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून शासन निर्णयाची अंमल बजावणी करावी तसेच तालुका शेतरस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समितीच्या तातडीने आदेश देण्यात यावेत.
तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात, शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, शिव पानंद शेत रस्त्यांचे सर्वेक्षण करून नंबरी हटवणार यांना दंड सुरू करावा, तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करावे,
शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावासाठी दर्जेदार शेतरस्ते करावेत, शेतरस्त्या अभावी पडीक राहणाऱ्या शेत जमीन धारकांना विना अट नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्या यावेळी शिव पानंद शेत रस्ता कृती समितीचा वतीने निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून दिलेल्या निवेदनावर शिवानंद शेळके, अमोल शेळके, भारत कदम, आसाराम खंटीग आसाराम, कारभारी निर्वळ, दादासाहेब भोरकडे,सुदाम भोरकडे, सुभाष पाते, विशाल भोरकडे, सिताराम कदम, विठ्ठल बालटकर,
विशाल राऊत, मारोती शेळके, गोरक्षनाथ शेळके, शाम कदम, गुणवंत गुंगाने, अशोक कचरे, बालासाहेब देवकीर, तुकाराम थोपटे, निवृत्ती भोरकडे, विष्णु जाधव, सुभाष होंडे, कृष्णा निर्मळ, अनिल निर्मळ, कल्याण कदम, काशिनाय देंडगे, सखाराम रासवे, दिलीप भोरकडे, कमलकिशोर निलेवर्ण, रमेशराव निलवर्ण, भगवावराव नारळे, आकाश निलवर्ण,वैजनाथ नारळे, परमेश्वर नारळे, रमेश नारळे, जनार्धन नारळे, काशिनाथ नारळे, बाबासाहेब नारळे, दिनेश भोरकडे, शिवाजी वाघमारे, शरद ठेंगे, माधव काकडे यांच्या सह शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
