ताज्या बातम्यामहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रसामाजिक

लिंबायत गावात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने उपासक उपासिका धम्म दहा दिवसीय शिबिराला सुरुवात

तालुका प्रतिनिधी समाधान कांबळे

माहूर :- पासून ३ किमी असलेल्या मौजे लिंबायत या गावात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने उपासक उपासिका धम्म शिबिराला सुरुवात झाली.

दि. ७/३/२०२५ पासून दहा दिवशीय उपासक उपासिका धम्म शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रमुख मार्गदर्शिका आदरणीय संध्याताई कांबळे केंद्रीय शिक्षिका नवी मुंबई हे दहा दिवस मार्गदर्शन करणार आहेत.

उद्घाटन करताना आयु. विजय भगत भारतीय बौद्ध महासभा तालुका उपाध्यक्ष माहूर, आयु. प्रा. डॉ राजेंद्र लोणे सर भारतीय बौद्ध महासभा माजी तालुकाध्यक्ष माहूर, आयु. प्रा. विनोद कांबळे भारतीय बौद्ध महासभा माजी तालुकाध्यक्ष माहूर, आयु. शांतीदूत मुळे भारतीय बौद्ध महासभा पर्यटन सचिव यवतमाळ, आयु. संजय कांबळे भारतीय बौद्ध महासभा सचिव यवतमाळ, उपासिका विजयाताई मुळे, उपासिका सिंधूताई वानखेडे,

तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयु नारायण पाटील सर हे होते. संतोष डोंगरे, बरडे साहेब, गायकवाड साहेब मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग होता.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!