ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

भीम आर्मी व आजाद समाज पार्टी कां. तर्फे प्रजासत्ताक दिन साजरा

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

पुसद – प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पुसद येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व कार्यकर्त्यांनी संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करून संविधान व प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. हा कार्यक्रम भीम आर्मी व आजाद समाज पार्टी (कांशीराम) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमास भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, आजाद समाज पार्टी युवा जिल्हाध्यक्ष राजकुमार भगत, युवा महासचिव विशाल भाऊ डाके उपस्थित होते.

भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ भालेराव यांनी मार्गदर्शन करत प्रजासत्ताकाचे महत्त्व सांगितले, संविधानाने दिलेल्या अधिकारांचे पालन करण्याची आणि समाजातील समानता व न्याय जपण्याची जबाबदारी नागरिकांवर असल्याचे स्पष्ट केलेहें संविधान तयार करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वर्षे 11 महिने 17 दिवसाचा कालावधी लागला 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी संपूर्ण देशात लागू करण्यात आले त्यांनी लोकशाहीचा आत्मा म्हणजे भारतीय संविधान असे त्यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले .

तसेच राजकुमार भगत व विशाल भाऊ डाके यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत संविधान आणि प्रजासत्ताक दिनाचे सामाजिक व वैचारिक महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी प्रज्ञा पर्व माजी अध्यक्ष सुखदेव भगत सर, नगरसेवक विशाल घाटे, विठ्ठल कांबळे सर, रमेश सावळे, केवटे साहेब,वैभव खरतडे, स्वयम इंगळे, अनिकेत खरतडे, संतोष कांबळे, अनिकेत खंदारे, सुमित आढाव तसेचकार्यक्रमात दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी उत्साहाने सहभाग घेत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साजरे केले. कार्यक्रम शांततामय व सुसंगत वातावरणात पार पडला.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!