ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिकसामाजिक

सौ. रामकंवर द्वारकादास लड्डा सेमी विद्यालयात स्काऊट गाईड तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न

मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे

मानवत (दिनांक 22 जुलै) येथील सौ रामकंवर द्वारका दास लड्डा या उपकमशील प्रयोगशील सेमी विद्यालयामध्ये मानवत पाथरी तालुकास्तरीय स्काऊट गाईड कार्यशाळेचे आयोजन स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय व विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्या ध्यापक श्री. विश्वभूषण इंगोले, प्रमुख उपस्थिती मध्ये मार्गदर्शक जिल्हा संघटक श्री. रमेश जाधव, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त श्री. विश्वनाथ बुधवंत, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त श्रीमती शेख राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त गाईडर श्रीमती कनकुटे, जिल्हा स्काऊट गाईड कार्यालय प्रमुख श्री. दीपक पंडित, उपक्रमशील मुख्या ध्यापक श्री. अशोक गोरे, गट साधन केंद्रातील ज्येष्ठ कर्मचारी श्री. गिरी एस. एस के. के. विद्यालयाचे मुख्या ध्यापक श्री. पुंडलिक कजेवाड, यांच्या सह दोन्ही तालुक्यातील मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री रमेश जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनातून मानवत व पाथरी तालुक्यातील सर्व विद्यालयासाठी स्काऊट ,गाईड, कब ,बुलबुल पथक विद्यार्थ्यांसाठी, स्काऊटर गाईडर शिक्षकांसाठी किती उपयुक्त ठरू शकते याविषयी मत व्यक्त केले.

स्काऊट गाईड कार्यालयीन प्रमुख श्री. दिपक पंडित यांनी ऑनलाइन नोंदणी व स्काऊट गाईड तब बुलबुल पथक विविध प्रक्रियेबाबतीत मार्गदर्शन केले. कार्यशाळा संपन्न झाल्यानंतर मानवत व पाथरी तालुक्यातील विविध विद्यालयांनी या कार्यशाळेमध्ये आपल्या विद्यालयातील स्काऊट गाईड ,कब–बुलबुल पथकांची नोंदणी केली.

अध्यक्षीय समारोप मध्ये श्री. विश्वभूषण इंगोले यांनी जास्तीत जास्त शाळेने या उपक्रमात सहभाग नोंदवून आपल्या विद्यालयाचे, विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार स्काऊट गाईड पथक तज्ञ तथा मुख्याध्यापक श्री.अशोक मोरे यांनी केले.

यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!