ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतसामाजिक

सावळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिना निमित्त अभिवादन

मानवत / प्रतिनिधी, प्रविण घागरे

मानवत (दिनांक २१ जुलै) तालुक्यातील मौ. सावळी येथे १८ जुलै रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या ५६ व्या स्मुर्ती दिनी अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुस्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कोणत्याही “बातम्या व जाहिरात” करिता परभणी मानवत प्रतिनिधी प्रविण घागरे यांच्याशी संपर्क साधावा…! महाराष्ट्र वायरल न्यूज यूट्यूब चॅनल व न्यूज पोर्टल वर प्रसारीत करण्यात येईल.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष शरद कांबळे, उपाध्यक्ष नारायण कांबळे, लहू क्रांती सेनेचे तालुकाउपाध्यक्ष दादाराव खिल्लारे, सामाजिक कार्यकर्ते कल्याण वैराळ, भगवान सरोदे, जनर्धन कांबळे, दादाराव खिल्लारे, भगवान सरोदे, गणेश कांबळे, अर्जुन कांबळे, जगन्नाथ कांबळे, माऊली बिंडे, अशोक भिसे, विशाल खिल्लारे, गोविंद कांबळे, बालासाहेब कांबळे, सखाराम कांबळे, तुकाराम कांबळे, सनी दात्रे, अनिल कांबळे, यांच्या सह समाज बांधव व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!