ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

रमाई घरकुल योजनेच्या फाईल त्वरित मंजूर करण्यात याव्यात!

[अन्यथा भिम टायगर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल]

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

यवतमाळ (दिनांक 17 जुलै) जिल्ह्यातील रमाई आवास योजनेच्या घरकुलांना त्वरित मंजुरी देण्यात यावी यासाठी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना भीम टायगर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

सविस्तर वृत्त असेही यवतमाळ जिल्ह्यातील रमाई आवास योजनेचे घरकुल मागील सहा महिन्यापासून घरकुल लाभार्थ्यांनी फाईल देऊन सुध्दा शासन दरबारी त्या फाईल धुळ खात पडून आहेत.

रमाई आवास योजनेच्या घरकुल बाबत जिल्हा स्थरावर माहिती घेतली असता सदर घरकुलाच्या फाईलवर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांची शिफारस झाली नसल्यामुळे मागील सहा महिन्यापासून रमाई आवास योजनेचे ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थी आपल्या हक्काच्या घरकुलापासून वंचित आहेत.

एकुण यवतमाळ जिल्ह्यात वंचित असलेले या लाभापासून एकुण ४१७० लाभार्थी यांच्या संस्कार उघड्यावर आलेले आहे.

ऐन पावसाळ्याच्या काळात लाभाथींना रमाई आवास योजनेचा लाभ न मिळ्याल्यामुळे त्यांची दैनदिन परिस्थिती अतिशय गंभीर व खालावलेली आहे त्यांचे संसार उघड्यावर आहेत याकडे तरी प्रशासनाने लक्ष द्यावे.

रमाई आवास योजनेचे यवतमाळ जिल्ह्यातील सोळा ही तालुक्यातील घरकुल संदर्भात दिलेल्या निवेदनाचा सकारात्मकहोऊन मंजुरात त्वरित न मिळाल्यास भीम टायगर सेना तीव्र स्वारुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, गंभीर परिस्थिती उद्भवल्यास शासन प्रशासन हे जबाबदार राहील या विषयाचे निवेदन देण्यात आले आहे.

या वेळी विदर्भ कार्याध्यक्ष टोनू भाऊ मेश्राम, जिल्हाध्यक्ष अजय शेंडे (रावण), जिल्हा प्रमुख (पूर्व)योगेश दादा रायपूरे, जिल्हा प्रमुख (पश्चिम )किशोर दादा कांबळे, जिल्हा संपर्कप्रमुख सुमेद पेटकर, युवा जिल्हाध्यक्ष विजय धुळे, युवा तालुकाध्यक्ष अक्षय उके व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!