ताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रसामाजिक

माहुर येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेचा दहावा वर्धापन दिन साजरा

🚨 (तसेच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,माहुर येथील दिव्याग असंलेल्या रेवा राठोड,प्रदिप शेरकुरवार यांचा जन्मदिन साजरा)

✍️बबलू भालेराव (मुख्य संपादक)

माहूर (दिनांक 16 जुलै) माहुर येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र या संघटनेचा दहावा वर्धापन दिन व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल,माहुर कपिलेश्वर मंदिर माहूर येथे साजरा करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र वायरल न्यूज चे मुख्य संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते बबलू भालेराव हे होते. दिव्यांग संघटनेचे नांदेडचे जिल्हाअध्यक्ष नवले साहेब हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून दिव्यांग संघटनेचे माहूर तालुका अध्यक्ष हे होते.

माननीय डाकोरे साहेबांनी इतर दिव्यग बांधवांना योजनेबद्दल सखोल मार्गदर्शन केले .आणिदिव्यांचा ना मिळणाऱ्या सवलती बदल सखोल माहिती दिली.,ग्रामपंचायत, नगरपंचायत , नगरपालिका, महानगरपालिका पंचायत समिती,जिल्हा परिषद ,आमदार, खासदार, निधी प्रत्येक ठिकाणाहून दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचा निधीसाठी मिळतो ते आपण सर्वजन स़घटितपणे संघर्ष केल्याशिवाय मिळत नाहि.

आपण सर्वांनी संघटित पुणे शासन प्रशासन जागे करण्यासाठी आतापर्यंत दहा वर्षांत अनेक प्रकारचे सदनिका मार्गाने आंदोलन केल्यामुळे आपणास हक्क मिळत आहे.किनवट माहुर तालुक्यातील शेकडो दिव्यांगानी जन्मदिन अभिष्टचिंतन सोहळ्यात आर्शिवाद दिला व संघटितपणे संघर्षात सहभागी होण्याचे आव्हान केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक क्षेत्रात काम करणारे महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल चे मुख्य संपादक मा.बबलु भालेराव दिव्यांग चळवळ वाढविल्या शिवाय संघटितपणे संघर्षासाठि एकत्रित शक्ति निर्माण केल्याशिवाय आपल्या उपेक्षित समाजाला काहि मिळत नाहि.

मी नेहमी आपल्या संघटनेची चळवळ डाकोरे साहेबांचे कार्य ऑनलाईन पाहात असतो त्यांची भेट आज मी फोन करुन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व चळवळीची माहिती पावसाचे दिवस असताना आपण दिव्यांग असुन मोठ्या संख्येने डाकोरे साहेबाना शुभेच्छा देण्यासाठी आलात मी सर्व पासुन तुमच्या एकजुटिला सलाम करतो तुमच्या कार्याला शुभेच्छा व आपल्या कार्यासाठी तुमच्या सोबत आहे.

म्हाडा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरकुलासाठी माहिती दिली ज्या दिव्यांगाना कागदपत्रे करण्यासाठी खर्च करता येत नसेल त्यांना मी खर्च करण्याचे आश्वासन दिले. सूत्रसंचालन माहुर माजी तालुका अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण केले.यांनी केले प्रस्तावित. जिल्हा उपअध्यक्ष राजु भाऊ शेरकुरवार यांनि केले आभार प्रदर्शन.ता.अध्यक्ष उमेश भगत यांनी केले केले.

या कार्यक्रमास किनवट ता.अध्यक्ष अंकुश राठोड,ता.सचिव शेख बसिर, भिमराव आत्राम, आनंदराव आत्राम राजूभाऊ,प्रेमसिंग चव्हाण, दादाराव कांबळे, उमेश भगत हेमसिंग आडे ,रेवा राठोड ,राजेश सुकळकर ,अमोल सोनवणे, विष्णू गायकवाड, वनिताबाई पेटकुले, इंदुताई चपटेकर ,चित्रा इंगोले, आशाताई पिसाळ पुष्पा कलाने, सुमनबाई हगवणे, माहूर किनवट तालुक्यातील शाखा प्रमुख सहित शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.

हा कार्यक्रम माहुर तालुक्यातील पदाधिकारी यांनी नाष्टा चहा पाण्याची,सर्वांचा सत्कार करून उत्साहात संपन्न झाला,असे प्रसिध्दी पत्रक माहुर ता.अध्यक्ष उमेश भगत यांनी दिले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!