शेतकरी सुकाणू समितीचा वतीने मानवत मध्ये बबनराव लोणीकरांच्या त्या वक्तव्याचा निषेध

(विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची शेतकरी सुकाणू समितीची मागणी)
मानवत / प्रतिनिधी प्रविण घागरे
परभणी:- परतुर विधानसभेचे आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर येथील आयोजित एका जाहीर सभेत शेतकरी व तमाम माय बहीणीना उदेशुन अपमानास्पद वक्तव्य केल्याने तमाम शेतकरी व मायबहिनींच्या भावना संतप्त झाल्या आहेत सदरील त्या वक्तव्याचा मानवत तालुका शेतकरी सुकाणू समितीचा वतीने जाहीर निषेध व्यक्त करून त्यांचे विधानसभेचे सदस्यत्व तात्काळ रद्द करावे.
अशी मागणी मानवत तहसीलदार यांच्या मार्फत राज्यपाल महोदय यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी दिलेल्या निवेदनावर संतोष आंबेगावकर, गोविंद घांडगे, दत्तराव शिंदे, कॉ. लिंबाजी कचरे पाटील, संपत पंडित, बंडू नाना मारकळ, पांडुरंग तात्या वझुकर, बालासाहेब आळणे पाटील, कॉ. रमेश साठे, कॉ. विष्णू जाधव, कॉ. आसाराम दुधे, संजय देशमुख यांच्या सह शेतकरी सुकाणू समितीचा पदाधिकाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
