मानवत येथील १७ वर्षीय युवक बेपत्ता

⚫मित्राकडे जाऊन येतो म्हणून घरातून गेला व घरी परतलाच नाही ;अज्ञाताकडून अल्पवयीन मुलाचे अपहरण
⚫अज्ञात व्यक्ती विरुद्ध मानवत पोलिसांत गुन्हा दाखल
मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे
मानवत येथील जिजाऊ नगर परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञाताकडून अपहरण झाल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी मानवत पोलिसात दाखल केली आहे. ही घटना २२ जून ते २३ जून च्या दरम्यान घडली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील माकपचे कार्यकर्ते रामराजे महाडिक यांचा १७ वर्षीय मुलगा रविवार २२ जून रोजी मित्राकडे जाऊन येतो म्हणून घरातून गेला व घरी परतलाच नाही. त्याचा शोध घेऊन वारंवार त्यास फोन केला जात होता परंतु त्याच्याकडून कोणत्याही फोनला उत्तर दिले जात नव्हते साडे पाचच्या सुमारास त्या मुलाचा फोन उचलला गेला आणि दहा मिनिटात घरी येतो असे सांगितले परंतु त्या नंतरही साधारणतः एक दीड तास मुलगा परत आलाच नाही व त्यानंतर त्याचा असलेला मोबाईल बंद आला.
रामराजे महाडिक यांनी आपल्या मुलाचा शोध घेतला त्यांना तो आढळून आला नाही शेवटी २३ जून रोजी मानवत पोलिसात उमेश रामराजे महाडिक वय १७ वर्ष राहणार जिजाऊ नगर मानवत याला कोण्या तरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणा स्तव फुस लावून पळून नेले असावे म्हणून रामराजे महाडिक यांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीवर भारतीय न्याय संहिताचे कलम १३७ (२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास मानवत पोलीस करीत आहे.
दिनांक २७ जून रोजी समाज माध्यमावर मुलाच्या वडिलांचा संदेश २२ तारखेपासून आपला मुलगा कोण्या तरी अज्ञात व्यक्तींनी पळून नेला मानवत पोलिसांनी अद्याप पर्यंतचा कोणताही शोध घेतला नाही म्हणून शेवटी २७ जून रोजी रामराज महाडिक यांनी गावातील गजानन महाराज मंदिराजवळ दोन गटात झालेल्या भांडणानंतर आपला मुलगा गायब झाला असून त्याचा शोध घ्यावा किंवा कोणाला आढळल्यास सदरील मो. नं. 9921782040 या वर संपर्क साधावा अशा आशयाचा संदेश समाज माध्यमावर व्हायरल केला. त्यानंतर आता नेमकं मानवत पोलीस यात कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
