निधी अपहार प्रकरणी वांगी – कुंभारी ग्राम पंचायतचे संरपंच व त्यांचे पती सह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238
मानवत (दिनांक ११ जानेवारी ) वांगी – कुंभारी ग्राम पंचायत मध्ये शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत एक कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाल्या नंतर वांगी – कुंभारी ग्राम पंचायतचे संरपंच आणि त्यांचे पती व ग्रामसेवक यांनी संगनमत करून शासकीय रक्कमेचा अपहार प्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मानवत येथील मुख्य न्याय दंडाधिकारी जी .ए. करजकर यांनी दिले आहेत.

दरम्यान या प्रकरणात वांगी येथील शेतकरी राधाकृष्ण एकनाथराव मुळे यांनी फिर्याद दाखल केली होती. यात वांगी – कुंभारी ग्राम पंचायतचे संरपंच निता नंदकुमार चौधरी त्यांचे पती नंदकुमार चौधरी व ग्रामसेवक मन्नथ साखरे यांनी संगन मत करून माहे – फेब्रुवारी २०२१ पासून ते आजपर्यंत शासकीय निधी तून अपहार केला आहे.
वांगी – कुंभारी ग्रामपंचायतचे शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत एक कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाली असून सरपंच निता चौधरी यांच्या ऐवजी नंदकुमार चौधरी हेच सह्या करतात. अनेक नियमबाह्य कामे केलीत. कागद पत्रांवर दाखवलेल्या खर्चाच्या प्रत्यक्ष चांगल्या प्रतीचे कामे केलेली नाहीत.

या संदर्भात गट विकास अधिकारी, तहसिलदार, उप विभागीय अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्त संभाजीनगर यांच्या कडे वारंवार लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या.

या तक्रारीची गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात आली नाही. मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्याया लयात अॅड. एम.एस. कुलकर्णी, कुंभारीकर, अॅड. आर. बी. वांगीकर, अॅड. अमोल जोशी, अॅड. एम. एम. कुलकर्णी, अॅड. मयुरी देशपांडे यांच्यामार्फत धाव घेऊन फिर्याद दाखल करण्यात आली.
या प्रकरणात सुनावणीत वांगी – कुंभारी ग्राम पंचायतचे शासनाकडून वेगवेगळ्या योजनेत एक कोटी ४१ लाख एवढी रक्कम प्राप्त झाल्या प्रकरणात वांगी – कुंभारी ग्राम पंचायतचे संरपंच, त्यांचे पती व ग्रामसेवक यांनी संगनमत करून शासकीय रक्कमेचा अपहार केल्या प्रकरणी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मानवत येथील मुख्य न्यायदंडाधिकारी जी. ए. करजकर यांनी दिले आहेत.
