क्रीडा क्षेत्रात शहिद भगतसिंग शाळेचा तालुका स्तरावर विजय

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 11 ऑक्टोंबर) क्रीडा क्षेत्रात उमरखेडचा लौकिक वाढवत नगर परिषद उमरखेडच्या शहिद भगतसिंग उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा क्रमांक 2 येथील विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावरील 4 x 100 मीटर रिले स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विजयाचा मान पटकावला.

या स्पर्धेत शाळेच्या अजमत मोहम्मद शहा, अमन मन्नान शेख, राजवीर अमोल बावणे आणि शुभम अमोल राठोड या चौकडीने उत्कृष्ट समन्वय, वेग आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्थ्यांना मागे टाकत विजेतेपद मिळवले. खेळाडूंच्या या यशामुळे शाळेत आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या विजयी संघाच्या यशामागे मुख्याध्यापक आशिष राठोड यांचे प्रेरणादायी नेतृत्व तसेच वैभव मांडवगडे, शेख शकील आणि डॉ. सुनील कवडे सर वर्गशिक्षक श्री राजे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शारीरिक शिक्षण शिक्षक गोपाल मुनेश्वर सर यांच्या प्रशिक्षणामुळे संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला.

विजयी खेळाडूंचे शाळा प्रशासन, पालक आणि स्थानिक क्रीडाप्रेमी यांच्याकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, या संघाकडून जिल्हास्तरीय स्पर्धेतही उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
