www.google.comउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषसन्मान सत्कारसामाजिक

करंजी येथे वर्षावास व ग्रंथ वाचन समारोप सोहळा थाटात संपन्न.

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

करंजी :- दि.7 ऑक्टोबर 2025 रोजी ढाणकी जवळ 5 किमी अंतरावर जवळच असलेल्या करंजी गावामध्ये आनंद बुद्ध विहारात मागील 3 महिन्यापासून आषाढी पोर्णिमा ते आश्विन पोर्णिमेपर्यंत वर्षावास काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र (लेखक डॉ. धनंजय कीर) यांनी लिहलेल्या ग्रंथाचे वाचन उपा. प्रभाताई देवराव घुगरे यांनी सातत्याने 3 महिने केले.

करंजी येथिल अनेक महिला पुरुष यांनी उपोसथ व्रत धारण केले होते त्या अनुषंगाने वर्षावास समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी9 वा पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहन बिटरगाव बु .पोलिस स्टेशनचे ठाणेदार साहेब श्री. पि. एल. शिंदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. समाजात निर्व्यसनी व्यक्ती निर्माण झाले पाहिजे ;त्यासाठी बुद्धाचे तत्व पाळावे. दारू गुटखा सिगारेट या व्यसनापासून दूर राहावे असे मोलाचे मार्गदर्शन ठाणेदार साहेबांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी घुगरे होते तर प्रमुख पाहुणे वक्ते इंजि.विद्वान केवटे (भारत मुक्ती मोचा राष्ट्रीय युवा मोर्चा उपाध्यक्ष) डि. के. दामोधर (वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष यवतमाळ), चिमणाजी काळबांडे (बौद्धाचार्य) प्रल्हाद काळबांडे योनी धम्माविषयी सखोल असे मार्गदर्शन केले तर मिलिंद चिकाटे साहेब TV9 मराठी माझा प्रतिनिधी दि बुद्धीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तालुका अध्यक्ष), राहुल चंद्रे सर, दिलीप कलाले, शिवाजी काळबांडे ,अनिल कांबळे, रामदास धुळे स्वप्निल काळबांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आंबेडकर चळवळ धमज्योत तेवत ठेवायची असेल तर निष्ठावान बना असे डि .के. दामोधर सर यांनी सांगितलेचळवळ जीवंत प्रामाणिक इमानदार माणूस ठेवू शकतो असे प्रतिपादन केवटे सरांनी आपल्या भाषणातून सांगितले अज्ञान अंधश्रद्धा नष्ठ करण्यासाठी विविध उदाहरणे देऊन महापुरुषांच्या विचाराची खरी गरज आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.

उपोसथ व्रत पालन केलेल्या उपासक उपासिकांचा जाहिर सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी सुमेध घुगरे यांनी केले सूत्रसंचालन राजेश घुगरे भा. बौद्ध.म. अध्यक्ष यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल गायकवाड सा, कार्यकर्ता यांनी मानले.

ग्रंथाचे शेवटचे पान वाचून व त्रिशरण पंचशिल घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव दत्ता घुगरे , चांदुराव घुगरे ,अशोक घुगरे ,जांबुवंतराव घुगरे ,सिद्धार्थ गायकवाड, भिमराव गणपत घुगरे ,विनोद कदम, संदिप देवबा घुगरे ,भारत घुगरे संजय घुगरे . रमेश घुगरे शाहिर विठ्ठल सोळंके,योगेश घुगरे आशिष घुगरे गजानन लाव्हरे ,अरविंद घुगरे कपिल दवने चंपत घुगरे गणेश घुगरे आदर्श घुगरे, लक्ष्मण राऊत,किरण सोनुले, अजय वाढवे,सारजाबाई हापसे शिलाबाई घुगरे विमलबाई घुगरे , लक्ष्मीबाई घुगरे,यशोदाबाई कदम आम्रपाली घुगरे व चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!