ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिक
उमरखेड तालुक्यातील बाळदी येथे ट्रॅक्टर मधून विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 26 जून) बाळदी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोस्तव निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व प्रथम दाखल पत्र विद्यार्थ्याची ट्रॅक्टर मधून प्रभात फेरी काढून स्वागत करण्यात आले.
पहिल्या प्रवेशित विध्यार्थ्याची मिरवणूक ट्रॅक्टऱ मध्ये बसून काढण्यात आले.त्यांना वाजत गाजत सर्व गावात फिरवण्यात आले.

तसेच प्रभात फेरी झाल्या नंतर मुलांना पाठ्यपुस्तक मोफत वाटप व गोड खाऊ वाटप करण्यात आले.या प्रसंगी शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष योगेश हरण, व गावातील काही पालक ही हजर होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुक्कावर सर, गायकवाड सर, यशवंतकर सर, बीटेवार सर, माहुरे सर, भोसकर सर, रोळे मॅडम, बोकडे मॅडम, नरवाडे मॅडम, आदी उपस्थित होते.
