कृषी धनताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषसन्मान सत्कारसामाजिक

पर्यावरणा क्षेत्रात विनोद दोंदल सन्मान

🛑 पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य यांच्या कडून सन्मानपत्र आणि वृक्ष देऊन सन्मान करण्यात आले. 🛑

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

यवतमाळ – (दिनांक 25 जून) चंद्रपूर येथील कामगार मनोरंजन केंद्र उर्जानगर येथे एकदंत सभागृहात दि.२२ जून ला नुकत्याच संपन्न झालेल्या पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय पर्यावरण संम्मेलन २०२५ पार पाडण्यात आला.

या कार्यक्रमात सामाजिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार व सन्मान करण्यात आले, याच संमेलनात यवतमाळ येथील विनोद दोंदल यांच्या पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सन्मान सोहळ्यात चंद्रपूर वणी- आर्णी लोकसभा खासदार प्रतिभाताई धानोरकर, सम्मेलनाचे उद्घाटक मा. सह उद्घाटक गडचिरोलीचे खासदार नामदेव किरसान आणि वरोरा भद्रावती क्षेत्राचे आमदार करण देवतळे तर अध्यक्षस्थानी चंद्रपूर येथील पत्रकार, दलीतमित्र व आदिवासी सेवक मा. डी. के. आरीकर अध्यक्ष प. स. व वि. स. या संमेलनात विशेष अतिथी म्हणून डॉ. रमेशकुमार बोरकुटे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव, उपप्रादेशिक अधिकारी उमाशंकर भादुले, सिटीपीएसचे प्रमुख अभियंता विजय राठोड, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म.रा.वि.म.चे महाव्यवस्थाक नंदकिशोर पांडे, आरटीओ किरण मोरे, दालमिया सिमेंटचे प्रणवकुमार नायक, टेमराज माले, विनोद सातपुते, सुरेखाताई रडके, विजयाताई रोकडे, सुधीर कोरडे, प्रदीप महाजन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

विनोद दोंदल यांनी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य जसे वृक्षारोपण करणे, मुलांना आपल्या जीवनातील वृक्षाचे महत्त्व पटवून देणे, ओसाड पडलेल्या जगलात फेकण्यासाठी सीडबॉल तयार करणे व सीडबॉल तयार करण्याची कार्यशाळा घेणे, गरजवंत, बिमार व्यक्तीनं मदत करणे, प्लास्टिक निर्मूलनात सहकार्य करणे, उन्हाळ्यात पशुपक्ष्यांसाठी पाणी पुरवठे तयार करणे, असेच एक ना अनेक सामाजिक कार्यात उपस्थित राहून स्वहस्ते उल्लेखनीय योगदान दिल्या बद्दल विनोद दोंदल यांचा आयोजक समिती पर्यावरण संवर्धन व विकास समिती महाराष्ट्र राज्य यांच्या कडून सन्मानपत्र आणि वृक्ष देऊन सन्मान करण्यात आले.

हया कार्यक्रमात सर्व महाराष्ट्रातील पर्यावरणावर व सामाजिक क्षेत्रात चागले कार्य करणारे असंख्य समाज सेवक उपस्थित होते, विनोद दोंदल यांनी हा मिळालेला सन्मान कोण्या एकट्याचा नसून आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे प्रकाश खुडसंगे, आशिष भोयर, कैलास कोडापे, अजय मांडवकर, अरविंद कोडापे, संदीप तेलंगे, पद्माकर राऊत, निलेश वाभीटकर, पवन तेलंगे, रजत चांदेकर, कुणाल भोयर, दीक्षाताई नगराळे, करुणाताई वानखेडे, स्नेहलताई ढाले, कविताताई धुर्वे, प्रतिभाआई तातेड, प्रियंकाताई सीडाम, जितेंद्र खोडे, वीरेंद्र चव्हाण, पवन जाधव, चंद्रकांत परचाके, प्रफुल्ल नन्ने,चेतन सामदवार, संदीप काळे, नितीन तुमडे, निखिल राऊत, चेतन दुर्गे, शैलेश आडे, मनोहर बोभाटे, गजुभाऊ सुरकर, अँड. दिपक जुमनाके, दीपक करडे, कैलास फुलभोगी, मनोज जुमनाके, संदिप पुरके, अशोक उमृतकर, हिमांशु चौधरी, रतन आत्राम, अभी भेले, प्रफुल शिवनुकर, संदीप काळे, सुहास वानखेडे, शरद वाघमारे, किशोर चौधरी, प्रसाद देवतळे, शुभम किन्नाके इत्यादी सर्वांचा आहे असे सांगीतले..

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!