ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिकसामाजिक

गणित ऑलिम्पियाड परिक्षे मध्ये झरी जिल्हा परिषद शाळेचे घवघवीत यश

(यशा बद्दल शाळेचा वतीने विद्यार्थीनीचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.)

मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरे

मानवत गणित ऑलिम्पियाड परिक्षेमध्ये झरी जिल्हा परिषद शाळेचा विदयार्थ्यांने घवघवीत यश संपादन केले आहे.

मानवत तालुक्यातील मौ. झरी येथील जिल्हा परिषद शाळेचा इयत्ता ४ थी ची विद्यार्थीनी कु. जीविका जीवन सत्वधर हिने गणित ऑलिम्पियाड परिक्षेमध्ये सर्व प्रथम क्रमांक प्राप्त करत यश मिळवले तर इयत्ता ७ वी मधील विद्यार्थीनी कु. सई सखाराम सत्वधर हिने या परीक्षेत जिल्ह्यातुन तृतीय क्रमांक प्राप्त करत यशा मिळवले आहे.

या यशाबद्दल दोन्ही यशस्वी विद्यार्थिनीचे शाळेचा वतीने कौतुक करत अभिनंदन केले आहे.

यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सारंगभाऊ सत्वधर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. पानेरे, श्री. शिंदे यांच्या सह शिक्षकवृंदांनी विद्यार्थीचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!