ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशहरसामाजिक
झरी ते मानवत रस्त्यावरील खड्डे युवकांनी स्वखर्चातून बुजवले

झरी येथील युवकांचा पुढाकार ; ग्रामस्थांच्या वतीने युवकांचा सन्मान
मानवत / प्रतिनिधी.प्रविण घागरे.
मानवत तालुक्यातील मौ. झरी हे गाव काही अंतरावर असून पावसामुळे येथील रस्त्याची दुरावस्था होऊन रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडली आहेत.
या यामुळे नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करताना कसरत करावी लागत आहे व खड्ड्यामुळे छोटे मोठे अपघात ही होत आहेत ही बाब लक्षात घेता झरी येथील युवकांनी पुढाकार घेत आपल्या स्वखर्चाने व श्रमदानाने रस्त्यावरील खड्डे बुजवून नागरिकांना रस्ता सुरळीत करून दिला आहे.
त्यामुळे या युवकांचे सर्वत्र कौतुक होत असून झरी ग्रामस्थांच्या वतीने पुढाकार घेतलेल्या गणेश सवणे, राम सत्वधर, नंदकुमार राऊत, दिपक रासवे, योगेश सत्वधर यांच्या सह सहभागी युवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
