पोलिसांनी पकडलेला ट्रॅक्टर रेती चोरांनी पळविला..!

गोळीबार करणे इतपत परिस्थिती झाली होती गंभीर..!वाळू माफियांच्या दादागिरी ने माहूर तालुक्यात गाठला कळस ; हिंगनी कुत्ते मार दिगडी परिसरातील घटना

✍🏻समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहुर तालुका प्रतिनिधी)
माहूर (दिनांक 20 जून) तालुक्यातील मौजे हिंगणी येथील पैनगंगा नदी पात्रावर असलेल्या मोठ्या बंधाऱ्याच्या समोरील भागातून असलेली मौल्यवान वाळू ट्रॅक्टर मध्ये भरून चोरी करत नेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड पोपनी संदीप आन्येबोईनवाड आणि कर्मचाऱ्यांनी येथे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेले असता पकडलेला ट्रॅक्टर येथील वाळू माफियांनी पोलिसांच्या तावडीतून झटापट करून पळवून नेल्याची घटना दि 19 रोजी सकाळी 9 वाजता घडल्याने खळबळ उडाली आहे.

हिंगणी येथील मोठा बंधारा केटी वेअर मध्ये अवैद्य रित्या वाळू उपसा करून त्याचे ट्रॅक्टर द्वारे वहन करीत आहेत, अशा गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक गणेश कराड साहेब, सोबत पोलीस उपनिरीक्षक संदीप अन्ये बोईनवाड, पो का पवन राऊत,पो का खंदाडे, पो का सोनटक्के यांचे सह पोलीस पाटलांना घेऊन 09:01 वा मोजे दिगडी कु शेतशिवारात विना नंबरचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर वाळू ने भरून असलेला पकडला असता कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन माहूर

येथे घेऊन येत असतान तीन इस्मानी पोलिसांच्या ताब्यात असलेला ट्रॅक्टर अडवून शासकीय कामात अडथळा करून बेकायदेशीर जमाव जमवून ट्रॅक्टर फुलसांगवी कडे घेऊन गेले नमूद तीन नागरिका विरुद्ध गैर कायद्याचे मंडळी जमून शासकीय कामात अडथळा केल्याबद्दल पोलीस ठाणे माहूर येथे गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक गणेश कराड सदर तपास पोलीस उप निरीक्षक संदीप अन्येबोईनवाड यांच्याकडे दिला आहे.

मोहोळ तालुक्यातील वडसा येथे तहसीलदार मुगाजी काकडे यांनी एक टिप्पर जप्त केला तर दुसरा टिप्पर तस्करांनी त्यांच्या तावडीतून पळून नेल्याची घटना घडलेली असतानाच पोलिसांच्या तावडीतूनही ट्रॅक्टर झटापट करून पळून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली असून पोलिसांना येथे गोळीबार करण्याची वेळ आली होती.असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
