ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

राजकुमार भगत “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित”

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

पुसद (दिनांक 13 जून) अमरावती येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार २०२५ वितरण सोहळा पार पडला. विविध क्षेत्रात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कला क्षेत्र, क्रीडाक्षेत्र ,राजकीय क्षेत्र उल्लेखनीय कार्य करणार्‍या मान्यवरांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.

आयोजक अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,अमरावती या संस्थेने स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता. पुसद जिल्हा यवतमाळ या संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत यांनाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सदरचा कार्यक्रम हा क्षितिज पॅलेस, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज चौक, रिंग रोड, नवसारी नाका, अमरावती या ठिकाणी पार पडला.राजकुमार भगत यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या वरती आसपासच्या परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे . तसेच अभिनंदन केले जात आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!